Kolhapur Dainik Gomantak
महाराष्ट्र

Kolhapur: कोल्हापूरात पाण्याच्या भांड्यासहित महिला रस्त्यावर, नेमकं काय आहे प्रकरण

Kolhapur: हॉकी स्टेडियम परिसरात महिला आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहे.

दैनिक गोमन्तक

Kolhapur: कोल्हापूरमध्ये पाण्यासाठी महिलांनी रास्तारोखो आंदोलन सुरु केले आहे. हॉकी स्टेडियम परिसरात महिला आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहे.

प्रशासनाने याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात ,अशी मागणी येथील नागरिकांची आहे. आपल्या मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्यसाठी महिलांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. महिलांनी हॉकी( Hockey ) स्टेडियम परिसरात पाण्याच्या भांड्यासह रस्त्यावर येत आपल्या मागण्या मांडल्या आहेत.

प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या महिलांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हॉकी स्टेडियम परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूरात काही तांत्रिक अडचणीमुळे एक दिवस आड पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या हॉकी स्टेडिय़म परिसरात पाणीपुरवठा बंद झाल्याने या परिसरातील नागरिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, अधिकाऱ्यांना पाणी( Water )पुरवठ्याबाबत विचारले असता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने आता महिलांनी थेट रस्त्यावर उतरत आपल्या मागण्या मांडल्या आहेत. जोपर्यत आयुक्त याठिकाणी येत नाहीत तोपर्यत आम्ही येथून हलणार नाही. त्याचबरोबर, आजच्या आज आपल्याला पाणीपुरवठा झाला पाहिजे असे महिलांनी म्हटले आहे. कोल्हापुरा( Kolhapur )तील पाण्याचा हा प्रश्न लवकरात लवकर सुटणे महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gegeneophis Valmiki: पश्चिम घाटात सापडली उभयचर प्राण्याची 'नवी' प्रजाती! दुर्मीळ केशिलियन; 'जेनेओफीस वाल्मिकी' असे नामकरण

Kashinath Shetye: बेकायदेशीर केबल्सप्रकरणी 2 मोठ्या टेलिकॉम कंपन्यांविरोधात तक्रार, काशिनाथ शेट्येंना जीवे मारण्‍याची धमकी

Chimbel: "..तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही"! 21 दिवसांपासून चिंबलवासीयांचे उपोषण सुरूच; प्रकल्पाच्या निर्णयानंतर ठरवणार आंदोलनाची दिशा

ED Raid Anjuna: गोव्यात ईडीची मोठी कारवाई! 2.83 कोटींच्या सापडल्या नोटा; बँक खाती गोठवण्याचे आदेश

Birch Club Fire: 'ठोस नियम नसताना नाईटक्लबला परवानगी कशी दिली'? बर्चप्रकरणी सरपंचाच्या कोठडीसाठी पोलिसांचा युक्तिवाद

SCROLL FOR NEXT