Mumbai- Kolhapur Flight Dainik Gomantak
महाराष्ट्र

Kolharpur to Mumbai Flight Service: आजपासून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेचा शुभारंभ

या विमानसेवेमुळे कोल्हापूर- मुंबई हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोईस्कर होणार आहे.

दैनिक गोमन्तक

बहुप्रतिक्षित कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा प्रारंभ आजपासून होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. ही सेवा संजय घोडावत यांच्या ‘स्टार एअरवेज’ कंपनीकडून सुरू केली जात आहे.

मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवा (Flight) ही आठवड्यातून तीन दिवस असणार आहे. आठवड्यातील मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी ही विमानसेवा असणार आहे. कोल्हापूर ते मुंबईसाठी (Mumbai) 2 हजार 573 रुपये इतका तिकीट दर असणार आहे. या विमानसेवेमुळे कोल्हापूर- मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोईस्कर होणार आहे.

विमान मुंबई विमानतळावरून 10.30 वाजता उड्डाण करणार आणि कोल्हापुरात 11.20 मिनिटानी कोल्हापुरात पोहचणार आहे. अवघ्या 40 मिनिटांचा हा प्रवास असणार आहे. तर कोल्हापुरातून सकाळी 11.50 वाजता उड्डाण करणार आणि मुंबईत 12.45 वाजता पोहचणार आहे. कोल्हापूर - मुंबई मार्गावर विमानसेवा सुरु व्हावी, अशी प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी होती.

कोल्हापूर मुंबई विमानसेवा कोरोना काळात (Corona) बंद करण्यात आली. कोल्हापूर मुंबई विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता. पण कंपनीने अचानक ही सेवा बंद केली होती. त्यानंतर सेवा सुरू व्हावी अशी प्रवाशाची अनेक दिवसांपासून मागणी होती. अखेर या मागणीला यश मिळाले.

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना ही सेवा सोयीची ठरणार आहे. सध्या कोल्हापूरातून तिरुपती, बंगळुरू, अहमदाबाग, हैदराबाद या शहरात सध्या विमानसेवा सुरू आहे. या विमानसेवेमुळे प्रवाशांच्या वेळीची बचत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT