know what is patra chawl land scam in which property of sanjay rauts wife was confiscated Dainik Gomantak
महाराष्ट्र

काय आहे पत्राचाळ घोटाळा? ज्यामध्ये ED ने संजय राऊतांची केली मालमत्ता जप्त

ईडीची ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचे राऊत म्हणाले

दैनिक गोमन्तक

ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फ्लॅट आणि जमीन जप्त केली आहे. एजन्सीने 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांचा अलिबागची जमीन आणि दादर आणि मुंबईतील प्रत्येकी एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे.

संजय राऊत यांनी मात्र ईडीची ही कारवाई मध्यमवर्गीय मराठी माणसावर हल्ला असल्याचे सांगत अशा पावलांना घाबरणार नसल्याचे सांगितले. राऊत म्हणतात की ईडीची कारवाई अशा दिवशी झाली जेव्हा मुंबई पोलिसांनी एजन्सीच्या अधिकार्‍यांवर झालेल्या खंडणीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. ईडीचे (ED) काही अधिकारी खंडणीचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप राऊत यांनी गेल्या महिन्यात केला होता. ईडीची ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचे राऊत म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही काळापूर्वी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून दावा केला होता की 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी करणारी ईडी त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध कट रचत आहे. संजय राऊत यांनी आरोप केला होता की लोकशाही पद्धतीने निवडून आलेली सरकारे पाडण्यासाठी ईडी आणि इतर केंद्रीय एजन्सींचा वापर केला जात आहे.

काय आहे पत्रा गोरेगाव चाळ घोटाळा

रिपोर्टनुसार पत्रा चाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे. चाळीत राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन तीन हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती.

हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा MHDA ला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.

ईडीने प्रवीणला पकडले तेव्हा संजय राऊतचे यांचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांचा मित्र आहे. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते, ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. चौकशी सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजयच्या मुलीच्या एका फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT