Nawab Malik Called Kirit Somaiya An Item Girl Of BJP Dainik Gomantak
महाराष्ट्र

किरीट सोमय्या म्हणजे भाजपचे 'आयटम गर्ल' नवाब मलिकांची बोचरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीच्या मंत्र्याचे घोटाळे बाहेर काढूण नेत्यांवर सातत्याने निशाणा साधत आहेत. आता राष्ट्रवादीचे (Nationalist Congress Party) प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी सोमय्या यांना भाजपची 'आयटम गर्ल' (Nawab Malik Called Kirit Somaiya An Item Girl Of BJP) ठरवत त्यांच्यावर निशाणा साधला.

नांदेड दौऱ्यात मलिक यांनी ही टीका केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले की, "जसा चित्रपट चांगला चालवण्यासाठी आयटम गर्लची गरज असते. तसे किरीट सोमय्या हे राजकरणातील 'आयटम गर्ल' सारखे आहेत.' बातमी चालण्यासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे भाजप चे आयटम गर्ल आहेत. अशी टिका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मालीक (Nawab Malik) यांनी केली आहे.

सोमय्या हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर करतात सातत्याने आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) मधील मंत्र्यावर सातत्याने आरोप करत असतात. त्यांच्या आरोपानंतर ईडीने संबधीत मंत्र्यावर कारवाई सुध्दा केली आहे. महाविकास आघाडी मधिल उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री अनिल परब, हसन मुश्रिफ यांच्यावर सुध्दा घोटाळ्याचे आरोप किरीट सोमय्या यांनी केले होते. तर किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT