नाशिक : राज्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Monsoon) कसारा घाटात (Kasara ghat) दरड कोसळली आहे. त्यामुळे कसाा घाटातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे रस्ते महामार्गाबरोबरट रेल्वे मार्गालाही या घटनेचा फटका बसला आहे. कसारा घाटात दरड कोसळल्याने नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरही काल मध्यरात्री दरड कोसळल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना ही जव्हार फाट्याजवळ घडली असून त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूकही पूर्णपणे रखडली आहे. (Khed Jagbudi river on the Mumbai-Goa highway has crossed danger level)
रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम
गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे डोंगरी भागात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. यादरम्यान देखील अशीच घटना समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाल्याचे दिसते आहे. नाशिकच्या दिशेला जाणारी रेल्वे वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली आहे. तसेच कसाराच्या अलिकडील रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे व्हिडिओ समोर येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबणार?
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. जगबुडी नदीच्या पुराचे पाणी आता खेडच्या बाजारपेठेतही शिरले आहे. बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यवसायिकांची आपल्या दुकानातील माल उचलण्याची धावपळ सुरू झाली आहे. खेड नगरपरिषदेकडून नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो आहे. चिपळूमधील वशिष्टी नदीच्या पाणी पात्रात वाढ होऊन सध्या धोकापातळीवर वाहते. पुराचे पाणी बाजारपेठेत शिरल्याने व्यवसायिकांची धावपळ उडालेली आहे.
दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यान वर्तविली आहे. मुंबईसाठी रेड अलर्ट हवामान विभागानं जाहीर केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.