Karnataka State Road Transport Corporation Dainik Gomantak
महाराष्ट्र

Karnataka-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा पूर्ण क्षमतेने सुरु

कर्नाटक (Karnataka) राज्य परिवहन महामंडळाने सोमवारपासून स्थानिकसह आंतरराज्य बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

बेळगाव: कर्नाटक (Karnataka) राज्य सरकारने आजपासून सर्वत्र अनलॉक (Unlock) केले आहे. त्यामुळे राज्यात आजपासूनच सर्व व्यवहार पूर्ववत सुरु राहणार आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातही अनलॉक असल्याने तेथील व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे दिसत आहे. म्हणून याच पार्श्वभूमिवर कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने सोमवारपासून स्थानिकसह आंतरराज्य बससेवा (Bus Services) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी कर्नाटक सरकराने आंतरराज्य बससेवा सुरु केली होती. मात्र प्रवासी नसल्याने ती बंदही केली होती. त्याचबरोबर सातारा आणि कोल्हापूर जिल्हात जाणारी बस सेवाही सुरू केली होती. (Karnataka State Transport Corporation has decided to start inter-state bus service)

आता लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिल्याने आंतरराज्यसह ग्रामीण भागातील सर्व मार्गावर बसेस धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांसह मजुरांना देखील दिलासा मिळाला आहे. कर्नाटक राज्य परिहवन विभागाच्या वरिष्ठ विभागाने कोरोनाचा वाढता संसर्ग बघता 50 टक्के बस प्रवासी क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी एस. टी. महामंडळाला दिली होती. मात्र आता सर्वत्र अनलॉक झाल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने पूर्ण क्षमतेने (100 टक्के) प्रवासी वाहतूक सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

त्यामुळे सध्या राज्यातून इचलकरंजी, गडहिंग्लज, बंगळूर, धारवाड, बेळगाव, हुबळी, दावणगिरी, हावेरी, हनगल या मार्गावर पूर्ण क्षमतेने बससेवा सुरु करण्यात आली आहे. या भागात जाणाऱ्या प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT