उस्मानाबाद: महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या स्थापनेपासूनच गेली कित्येक वर्ष मराठी आणि कानडी भाषा वाद सुरू आहे. आता शासकिय कार्यालयापेक्षा रस्त्यावर हा वाद जास्त पेटताना दिसतो आहे. त्यामुळे महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) सीमाभागात नेहमी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं आहे. या सर्व वादात शिवसेनेने नेहमीच मराठी भाषेचा मुद्दा लावून धरत कर्नाटकला विरोध केला आहे. आता पुन्हा याच वादामुळे शिवसैनिक (Shiv Sena) आणि कर्नाटक पोलीस (Karnataka Police) आमने सामने आल्याचं चित्र दिसत आहे. (Karnataka Police has set up temporary border check posts along the Maharashtra border)
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगाजवळील कसगी येथिल सीमेवर कर्नाटक पोलिसांनी सीमा तपासणी चेक पोस्ट नाके उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या प्रयत्नाला स्थानिक शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला आहे. उमरगा मतदार संघाचे शिवसेना पक्षाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निर्देशानंतर शिवसैनिक चक्क रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे आता सीमा भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर गावकऱ्यांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं.
महाराष्ट्र हद्दीत तात्पुरते चेक पोस्ट
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या प्रकाराबाबत लेखी तक्रार केली आहे. कर्नाटकच्या या अतिक्रमण प्रकरणाने येणाऱ्या काळात या भागात वाद पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कर्नाटक पोलिसांनी सीमेच्या लगत महाराष्ट्र हद्दीत तात्पुरते सीमा चेक पोस्ट उभे केले आहेत, असं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
दरम्यान, सीमा चेक पोस्ट हे नेहमी आपआपल्या राज्याच्या महसुली भागात उभारले जातात. मात्र, कर्नाटक शासनाच्या वतीने या भागात नव्यानेच कायमस्वरूपी सीमा चेक पोस्ट उभे करण्यात येणार असल्याची माहिती खासगी भागात पाहणी करताना गुलबर्गा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
कन्नडिगांची घुसखोरी शिवसेना चालू देणार नाही
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आपल्या हद्दीत कर्नाटक प्रशासनाद्वारे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जिल्हाधिकारी, उस्मानाबाद व पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद यांच्याशी पत्रव्यवहार व दूरध्वनीवरून हे अतिक्रमण रोखण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या आहेत.
शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, युवा सेनेचे योगेश तपसाळे, शरद पवार, संदीप चौगुले, माजी सरपंच हणमंत गुरव, संदीप जगताप, कसगी ग्रामस्थ व इतर शिवसैनिकांनी घटनास्थळी पोहचून प्रखर विरोध दर्शविल्याने कर्नाटक प्रशासनाने आता माघार घेतली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.