K. Vishwnath Dainik Gomantak
महाराष्ट्र

K. Vishwnath's Wife Passes Away: दिग्दर्शक के विश्वनाथ यांच्या निधनानंतर अवघ्या 24 दिवसांत त्यांच्या पत्नीचंही निधन...

गोमन्तक डिजिटल टीम

K. Vishwnath's Wife Passes Away: तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक के विश्वनाथ यांचे सुमारे २४ दिवसांपूर्वी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर एक महिन्यानंतर पत्नी जयलक्ष्मी यांनीही जगाचा निरोप घेतला आहे. वय झाल्यामुळे त्यांना काही व्याधी जडल्या होत्या.

त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये पवन कल्याण आणि चिरंजीवी दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही स्टार्स जयलक्ष्मी यांना त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये भेटायला आले होते

जयलक्ष्मी यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिग्दर्शक के विश्वनाथ यांच्या निधनाला एक महिनाही उलटलेला नाही आणि आणखी एका मृत्यूने घरावर शोककळा पसरली आहे. 

जयलक्ष्मी यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

टॉलिवूड दिग्दर्शक के विश्वनाथ यांनी 2 फेब्रुवारी 2023 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांना वयाशी संबंधित समस्या होत्या. त्यांच्या अनेक चित्रपटांसाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

त्यांची पत्नी जयलक्ष्मी कुरनूल जिल्ह्यातल्या होत्या त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीला एक मोठा धक्का बसला आहे. त्यांना 3 मुलं आहेत . रवींद्रनाथ विश्वनाथ, नागेंद्रनाथ विश्वनाथ आणि एक मुलगी पद्मावती विश्वनाथ आणि 6 नातवंडे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

SCROLL FOR NEXT