Jitendra Awhad Dainik Gomantak
महाराष्ट्र

थेट कारवाई कोणाच्या बोलण्यावरुन केली? भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांनी...

दैनिक गोमन्तक

मिरा-भाईंदर शहरात काशिमिरा परिसरातील आरक्षण क्रमांक 364 मध्ये मीरा भाईंदर महानगर पालिकेकडून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. परिसरातील झोपडीधारकांनी याची तक्रार राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे केली. या संदर्भात मंत्री आव्हाड यांनी तत्काळ पालिकेचे उपयुक्त स्वप्नील सावंत यांना फोन करून त्यांचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी पुनर्वसन न करता कारवाई कशी केली असा प्रश्न उपस्थित करत, हे राज्य कायद्याचे आहे हिटलरशाही चालणार नाही असा दम उपायुक्त यांना फोनवरून दिला. राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे मीरा भाईंदर येथे आले असता त्यांनी महापालिकेच्या उपायुक्तांना चांगलाच समाचार घेतला.

मीरा भाईंदर मधील काशीमीरा परिसरातील आरक्षण क्रमांक 364 या जागेवर असलेल्या अनेक झोपडपट्टीवर मीरा भाईंदर महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली. त्यानंतर या परिसरातील होप फाऊंडेशनचे अध्यक्ष साहिल मिश्रा यांच्या सहित 20 ते 25 महिलांनी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची कार्यक्रमादरम्यान भेट घेऊन लेखी निवेदन दिले आणि आपल्या व्यथा आव्हाडांसमोर मांडल्या.

या परिसरातील नागरिक हे 1990 ते 1995 च्या काळापासून या जागेवर राहत आहेत. मागील वीस ते पंचवीस वर्षापासून घरपट्टी देखील आम्ही भरली असून अचानकपणे बाजूला असलेल्या विकासकाच्या फायद्यासाठी आमच्यावर कारवाई केली असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी मंत्री आव्हाड यांना दिली.

होप फाऊंडेशनच्या या लेखी निवेदनाची गंभीर दखल घेत आव्हाड यांनी तात्काळ पालिकेचे उपायुक्त स्वप्नील सावंत यांना फोनवरुनवरून संपर्क साधून त्यांना चांगलेच फैलावरती घेतले. फोनवरून उपायुक्तांशी संवाद साधताना आव्हाड यांनी ही जागा पालिकेची (Municipalities) असली तरी त्याच्या जागेवर गोरगरीब जनता राहत आहे. 95 च्या अगोदरचे स्थानिक त्याठिकाणी आहेत तर त्यांना 268 अन्वये नोटीस का दिली नाही? 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्यास का सांगितले नाही? असा सवाल यावेळी आव्हाड यांनी उपयुक्तांसमोर उभा केला.

थेट बेधडक कारवाई कोणाच्या बोलण्यावरुन केली, जरी आयुक्तांचा आदेश असला तरी बेकायदेशीर आदेशाचे आपण पालन करणार का? असा जाब त्यांनी उपायुक्तांना विचारला. यापुढे त्या जागेवर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांवर जर बुलडोजर चढवला तर त्या जागेवर मी स्वतः येईल असा सज्जड दम मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. अगोदर त्यांचे पुनर्वसन करा त्यांच्या हातात चाव्या द्या त्यानंतर झोपड्या तोडा अशी सूचना गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी उपायुक्त स्वप्नील सावंत यांना केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

SCROLL FOR NEXT