Maharashtra Weather Updates Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Weather Updates: शेकोटिवर हात शेकणं पडलं महागात

देशासह महाराष्ट्रातही कडाक्याच्या थंडीची (Maharashtra Weather Updates) लाट पसरली असून या थंडीने संपूर्ण राज्य गारठून टाकल्याच दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

नाशिक: थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी केली आणि एका महिलेचा त्या शेकोटिमुळेच मृत्यू झाला. देशासह महाराष्ट्रातही कडाक्याच्या थंडीची (Maharashtra Weather Updates) लाट पसरली असून या थंडीने संपूर्ण राज्य गारठून टाकल्याच दिसत आहे. शिवाय या दिवसांमध्ये प्रत्येक जण आपआपल्या परीने थंडीपासून (Cold) रक्षण करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. ग्रामिण भागात गावाकडे कोणी शेकोटी पेटवतात तर कोणी गाड्यांचे टायर पेटवून हातपाय शेकत बसतात. मात्र थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सदर घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळालीआहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या हिवाळ्याच्या मोसमात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे थंडी जाणवत आहे. मुंबईत बुधवारी कमाल तापमान 27.1 अंश सेल्सिअस, सामान्यपेक्षा 4 अंशाने कमी आणि किमान तापमान 14.4 अंश सेल्सिअस, सामान्य तापमानापेक्षा 3 अंश कमी नोंदवले गेले त्यामुळे अनेक भागात थंडी जाणवत आहे.

पुढील दोन दिवस थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत वाढत्या थंडीमुळे सकाळी धुके दिसत आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील नागपूरसह अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबतच या भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी नागपूरसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई

आज मुंबईत कमाल तापमान 29 तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

पुणे

पुण्यात कमाल तापमान 27 तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

नागपूर

नागपुरात कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथे आकाश ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नाशिक

नाशिकमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

औरंगाबाद

आज औरंगाबादमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यास रोखलं म्हणून गोळी घातली; अमेरिकेत भारतीय तरुणाचा खून

Nepal Protest: राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, गृहमंत्र्यांच्या घराला लावली आग! नेपाळमध्ये राडा सुरुच; PM ओली सोडणार देश?

Goa Chess: 38व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वाढली चुरस! शौनक, दीक्षिता विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू,भाजपकडे अधिक खासदार; पण विरोधकांना 'क्रॉस व्होटिंग'ची आशा

Bits Pilani: 9 महिन्यांत पाच मृत्यू का झाले? विद्यार्थ्यांचे मानसिक दडपण कसे दूर होणार?

SCROLL FOR NEXT