26/11 दहशदवादी हल्ला  Dainik Gomantak
महाराष्ट्र

26/11 च्या मुंबई दहशदवादी हल्ल्याला 13 वर्षे झाली

पाकिस्तानने (Pakistan) त्यांच्या 4,000 हुन जास्त दहशतवाद्यांची नावे काढून टाकली आहेत.

दैनिक गोमन्तक

आज 26 नोव्हेंबर या दिवशी गेल्या 13 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये (Mumbai) दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये अनेकाना आपल्या प्राणाला मुकावे लागले. या घटनेला आज 13 वर्षांपूर्वी पूर्ण होत झाली. याच दिवशी दहशतवाद्यांनी त्यांच्या कारस्थानांनी लोकांच्या स्वप्ननगरीला भयभीत केले. त्यावेळी पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी जवळपास 4 दिवसांत 12 मोठे हल्ले केले होते. यामध्ये मुंबईतील (Mumbai) ताजमहाल पॅलेस हॉटेल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि छत्रपती शिवाजी टर्मिनससह इतर ठिकाणी झालेल्या ह.ल्ल्यात तब्ब्ल 15 देशांतील 166 लोकांचा मृत्यू झाला होता.

26/11 मधील शहिदांना मुंबई पोलीस आयक्त कायार्लयात (Commissioner of Police) अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री,(CM), उपमुख्यमंत्री सह शहीद जवानांचे कुटूंबीय उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी कुटूंबियांची भेट घेतली.

2008 च्या मुंबई हल्ला, ज्याला 26/11 बॉम्बस्फोट (Bomb blast) म्हणूनही ओळखले जाते. त्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला. या स्फोटांनी, पाकिस्तानशी आधीच ताणलेल्या संबंधांसह, भारत सरकारला दहशतवादविरोधी कारवाया करण्यासाठी गंभीर दृष्टीकोन घेण्यास आणि त्याच्या पैलूंचे परीक्षण करण्यास प्रवृत्त व्हावे लागली.

पाकिस्तान प्रामाणिक नाही

26/11 च्या 13 वर्षानंतर पाकिस्तानने(Pakistan) सार्वजनिक मान्यतेसह सर्व पुरावे उपलब्ध करून पीडितांना न्याय दिला नाही. 7 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी न्यायालयाने हाफिज सईदच्या आदेशानुसार या भीषण हल्ल्यात सहभागी असलेल्या सहा दहशतवाद्यांची सुटका केली. लष्कर-ए-तैयबाचा कमांडर आणि 2008 च्या मुंबई हल्ल्याचा प्रमुख झकी-उर-रहमान लख्वी यालाही देशातील पंजाब प्रांताच्या दहशतवादविरोधी विभागाने (CTD) दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याच्या आरोपाखाली अटक केली. २०१५ पासून तो जामिनावरच होता.

यादीतून 4000 दहशतवाद्यांची नावे वगळली

या वर्षी दहशतवादी (Terrorist) लख्वीला पुन्हा एकदा पाकिस्तानात अटक केली होती. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना तपास आणि प्रतिआरोप टाळण्यासाठी त्यांची नावे सतत बदलत राहतात. वास्तविक, संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी संघटनेने त्यांच्यावर नजर ठेवली आहे.

यापूर्वी, या वर्षी एप्रिलमध्ये, न्यूयॉर्कस्थित आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्ट-अपने उघड केले कीपाकिस्तानने त्याच्या दहशतवादी 4,000 हुन जास्त दहशतवाद्यांची नावे काढून टाकली आहेत. हटवलेल्या नावांमध्ये लष्कराचा (army) नेता आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकीर उर रहमान लखवी आणि इतरांचा देखील समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT