Omicron  Dainik Gomantak
महाराष्ट्र

नागपूरात ओमिक्रॉनचा शिरकाव

40 वर्षीय व्यक्तीला संसर्ग झाला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आणि राजस्थाननंतर आता आंध्र प्रदेश आणि चंदीगडमध्येही ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण आढळले आहेत. विशाखापट्टणममध्ये या प्रकाराचा एक रुग्ण संक्रमित आढळला आहे. त्याचवेळी नागपुरात कोरोनाच्या नवीन प्रकाराची पहिली केसही समोर आली आहे. 40 वर्षीय व्यक्तीला संसर्ग झाला आहे.

रविवारी आणखी चार ओमिक्रॉन रुग्ण आढळले. हे रुग्ण चंदीगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात आढळून आले. यासह, देशात आतापर्यंत 37 लोक Omicron प्रकाराला बळी पडले आहेत.

नागपूरात (Nagpur) 40 वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. या पॉसिटीव्ह असलेल्या 40 वर्षीय रुग्ण पश्चिम आफ्रिकेमधून आला आहे. ज्या वेळी हा व्यक्ती नागपुरात आला त्यानंतर त्यांची कोरोना चाचणीसह जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले होते. या चाचणीनंतर त्यास ओमिक्रॉन संक्रमण झाला आहे असे समोर आले आहे. आता या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संबंधित रुग्णाच्या कुटुंबामधील इतर लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. परंतु त्या सर्वांचे विलगीकरण केले आहे.

तसेच संबंधित रुग्णांच्या संपर्कातील इतर लोकांचा शोध सुरु असून त्यांच्या सर्वांच्या चाचण्या प्रशासनाकडून केल्या जाणार आहेत. चार डिसेंबर रोजी संबधित व्यक्ती नागपुरात विमानतळावर आले होते. तेथे त्यांची नमुने घेतले होते. यामध्ये ते कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये (genome sequencing) त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

कोणत्या राज्यात किती आहेत ओमिक्रॉन रुग्ण

  • महाराष्ट्रः 18

  • राजस्थानः 9

  • गुजरातः 3

  • कर्नाटकः 3

  • दिल्लीः 2

  • चंडीगढ़:1

  • आंध्र प्रदेशः

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT