Omicron Variant
Omicron Variant Dainik Gomantak

पिंपरी चिंचवड येथील दीड वर्षाच्या चिमूकलीने केली 'ओमिक्रॉन'वर मात

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) क्षेत्रातील चार नवीन रुग्णांमध्ये तीन वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे.
Published on

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागातील एका दीड वर्षाच्या मुलीला कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन (Omicron variant) प्रकाराची लागण झाली होती. तीने या आजारावर मात केली आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

Omicron Variant
जे पवारांना 25 वर्षांपूर्वी कळले ते कळायला शिवसेनेला अनेक वर्षे लागली; राऊत

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) क्षेत्रातील चार नवीन रुग्णांमध्ये तीन वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. हे सर्व रुग्ण नायजेरियातील भारतीय वंशाच्या महिलेच्या आणि तिच्या दोन मुलींच्या संपर्क होते, ज्यांना आधी ओमिक्रॉन प्रकाराची लागण झाली होती. ही महिला पिंपरी चिंचवड येथे भावाला भेटण्यासाठी आली होती.

"आधी सापडलेल्या सहा ओमिक्रॉन रूग्णांपैकी चार रूग्णांची कोरोना (Coronavirus) चाचणीचे निकाल निगेटिव्ह आल्याकारणाने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Omicron Variant
नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाची जमीन बळकावली; किरीट सोमय्या

तीन वर्षांचा रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. इतर तीन रुग्ण देखील लक्षणे नसलेली आहेत. काळजीचे कारण नाही, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

पुणे (Pune) शहरातील एकमेव ओमिक्रॉन रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली आहे, त्यालाही शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. तो फिनलंडहून पुण्याला परतला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com