INS Ranvir Twitter/ @USAndMumbai
महाराष्ट्र

INS रणवीरमध्ये स्फोट! तीन जवान शहीद

जाणून घ्या INS रणवीर काय आहे

दैनिक गोमन्तक

मुंबईत आयएनएस रणवीर (INS Ranvir) या युद्धनौकेत स्फोट झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी उशिरा आयएनएस रणवीरमध्ये झालेल्या स्फोटात भारतीय नौदलाचे तीन जवान शहीद झाले, तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटाबाबत माहिती देताना भारतीय नौदलाच्या (Indian Navy) अधिकाऱ्याने सांगितले की, INS रणवीर पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि लवकरच बेस पोर्टवर परतणार होते. दरम्यान, आयएनएस रणवीरमध्ये स्फोट झाला आणि हि दुर्घटना घडली.

नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या स्फोटात कोणतीही मोठी हानी झालेली नाही. असे त्यांनी सांगितले मात्र, आयएनएस रणवीरमध्ये स्फोट कसा झाला याची चौकशी करण्यासाठी बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

जाणून घ्या INS रणवीर काय आहे

INS रणवीर ही एक युद्धनौका आहे आणि ती भारतीय नौदलाच्या राजपूत वर्गातील 5 विनाशक जहाजांपैकी चौथे जहाज आहे. ऑक्टोबर 1986 मध्ये ते जहाज नौदलात सामील झाले. INS रणवीरमध्ये 30 अधिकारी आणि 310 खलाशी आहेत. जे शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे. यामध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभागावर आणि जमिनीपासून हवेत मारा करणारी मोठं मोठी क्षेपणास्त्रे, विमानविरोधी, क्षेपणास्त्रविरोधी तोफा आणि टॉर्पेडो, पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर्सही आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT