Income Tax department conduct raids on companies retarded to Maharashtra deputy CM Ajit Pawar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

आयकर विभागाच्या छाप्यामुळे अजित पवारांचा संताप , म्हणाले...

याला दुजोरा देत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, होय, आयकर विभागाने माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकले आहेत. कोणावरही छापे टाकण्याचा अधिकार प्राप्तिकर विभागाला आहे.

दैनिक गोमन्तक

आज सकाळपासूनच आयकर विभाग (Income Tax Department) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कंपन्यांवर छापे (Raid) टाकत आहे. याला दुजोरा देत अजित पवार म्हणाले की, होय, आयकर विभागाने माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकले आहेत. कोणावरही छापे टाकण्याचा अधिकार प्राप्तिकर विभागाला आहे. त्यांना जर काही संशयास्पद आढळलं तर ते छापे टाकतात.(Income Tax department conduct raids on companies retarded to Maharashtra deputy CM Ajit Pawar)

अजित पवार पुढे म्हणाले की, कोणत्याही संशयास्पद व्यक्तीवर छापे टाकण्याचा अधिकार आयकर विभागाला आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. मी नियमित कर भरतो. मी स्वतः अर्थमंत्री आहे आणि कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवस्थापन करावे लागते हे मलाही समजतं . कोणताही कर लपवायचा नाही आणि तो कसा भरला जातो. मला याबद्दल पूर्ण माहिती आहे.

या सगळ्या बाबींवर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, माझ्याशी संबंधित कंपन्यांनीही वेळोवेळी कर भरला आहे. असे असूनही, राजकीय आकसापोटी हा छापा टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर मला या प्रकरणी काहीही बोलायचे नाही, मी एक नागरिक देखील आहे, पण मला दुःख आहे की माझ्या बहिणी ज्यांचे 35-40 आहे त्यांचे लग्न झाले आहे, जे त्यांच्या सांसारिक जीवनात व्यस्त आहेत. त्यांच्यावरही रेड टाकण्यात आली आहे. ही गोष्ट दुर्दैवी असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले आहे.

तसेच या छाप्यावर अधिक बोलताना या सगळ्या सरकारी संस्थांचा कोणत्या पातळीवर गैरवापर होत आहे हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले पाहिजे.असे मत व्यक्त केले आहे. अजित पवार म्हणाले की, माझ्या कंपन्यांवर छापे पडले याची मला खंत नाही. पण माझ्या नातेवाईकांवर छापा का टाकण्यात आला? त्यांचा या सगळ्या गोष्टींशी काहीच संबंध नाही. मी आजपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण पाहिले नाही.असे सांगतच ते म्हणाले की सरकारे येतात आणि जातात, पण येथे जनता सर्वकाही आहे आणि ती जनता नेहमीच योग्य निर्णय घेते .

दरम्यान आज आयकर विभागाने आज ज्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत त्या सर्व कंपन्या साखर कारखान्यांशी संबंधित आहेत. आणि हे सारे अजित पवार यांचे मित्र आणि नातेवाईक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तवडकरांना मिळाली गावडेंकडे असलेली सर्व खाती, 'आदिवासी कल्याण'ही पाहणार; कामतांकडे PWD, आणखी 2 मंत्र्यांना मिळाली 2 खाती

Bicholim: डिचोलीत झाली 4 टन फुलांची विक्री, भाव वाढल्याने विक्रेते आनंदी; चतुर्थीच्या पूर्वदिनी 'अच्छे दिन'

Goa Live Updates: जम्मू परिसरात दिवसात 380 मिमी पाऊस

Modak Significance: गणरायाला का प्रिय आहे मोदक? काय सांगते पुराण? वाचा महत्व..

Ganesh Festival: बौद्ध-जैन धर्मीयांनाही मान्य असलेले दैवत, गणपतीबाप्पाचे सर्वधर्मीय आकर्षण

SCROLL FOR NEXT