Income tax department attached 1000 cr property of deputy chief minister of Maharashtra Ajit Pawar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

आयकर विभागाने अजित पवारांची 1 हजार कोटींची संपत्ती केली जप्त

आयकर विभागाने गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरांशी संबंधित असलेल्या किमान 70 ठिकाणी छापे टाकले होते

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) मंगळवारी सकाळी अजित पवार यांची एक हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेनामी मालमत्ता जप्त केली असून राज्य सरकार अडचणीत येण्याचे संकेत मिळत आहेत. (Income tax department attached 1000 cr property of deputy chief minister of Maharashtra Ajit Pawar)

या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये पवारांचा दक्षिण दिल्लीतील असलेल्या सुमारे 20 कोटींच्या फ्लॅटचा समावेश आहे. तसेच निर्मल हाऊस येथील पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने जप्ती आणली असून त्याची किंमत सुमारे 25 कोटी आहे. जरंडेश्वर साखर कारखाना सुमारे 600 कोटींचा आहे. याशिवाय गोव्यातील निलय नावाचे रिसॉर्ट 250 कोटींचे आहे. आणि आता आयकर विभागाकडून अजित पवार यांना 90 दिवसांचा कालावधी मिळणार आहे ज्यात त्यांना हे सिद्ध करावे लागेल की त्यांच्या जप्त केलेल्या मालमत्ता बेनामी पैशाने विकत घेतल्या नाहीत.

आयकर विभागाने गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरांशी संबंधित असलेल्या किमान 70 ठिकाणी छापे टाकले होते. छाप्यांदरम्यान सुमारे 184 कोटी रुपयांच्या बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावे सापडल्याचे आयकर विभागाने म्हटले होते. छाप्यांमध्ये 2.13 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 4.32 कोटी रुपयांचे दागिने देखील जप्त करण्यात आले होते.

तत्पूर्वी काल रात्री अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रात्री उशिरा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 12 तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर अटक केली. हे मनी लाँड्रिंग प्रकरण महाराष्ट्र पोलीस आस्थापनातील एका कथित खंडणी टोळीशी संबंधित आहे. देशमुख यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देशमुख यांनी त्यांच्या चौकशीदरम्यान प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले आहे. या प्रकरणात ईडीने जारी केलेल्या किमान पाच समन्सवर देशमुख हजर झाले नाहीत, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात समन्स रद्द करण्यास नकार दिल्यानंतर ते एजन्सीसमोर हजर झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement: 23 वर्षांचा प्रवास, असंख्य जागतिक रेकॉर्ड! ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; कोट्यवधी चाहत्यांचे पाणावले डोळे VIDEO

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.57 की 3? आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार? थकबाकीचं संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Crime: दोन्ही हातांत कोयते घेऊन दहशत; कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांना धमकावणारा तरुण ताब्यात

Stray Dog Management: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात दिरंगाई; 8 पंचायत सचिवांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Goa Agriculture: गोव्याचा पारंपरिक कृषी वारसा धोक्यात? नारळ प्रक्रिया आणि मीठ उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडे साकडे

SCROLL FOR NEXT