Manache Shlok Film Dainik Gomantak
महाराष्ट्र

Manache Shlok Film Controversy: ‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत साहित्याचा अपमान, चित्रपटाचे नाव तात्काळ बदला, हिंदू जनजागृती समितीची मागणी

Hindu Janajagruti Samiti Objects: 'मनाचे श्लोक' या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर करुन त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यावर हिंदू जनजागृती समितीने (HJS) आक्षेप घेतला.

Manish Jadhav

Manache Shlok Film Controversy: राष्ट्रसंत संत समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या 'मनाचे श्लोक' या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर करुन त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यावर हिंदू जनजागृती समितीने (HJS) आक्षेप घेतला. धार्मिक ग्रंथाचे नाव केवळ व्यावसायिक लाभ आणि मनोरंजनासाठी वापरणे, हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे असल्याचे समितीने म्हटले.

रामदास स्वामींचा अपमान

'मनाचे श्लोक' हा ग्रंथ नैतिक मूल्ये आणि धर्मज्ञान शिकवणारा आहे. अशा ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटाचे शिर्षक म्हणून देणे हा कोट्यवधी श्रीरामभक्तांच्या आणि समर्थभक्तांच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. या संदर्भात बोलताना हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोळंकी म्हणाले की, "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी कुराण किंवा बायबल यांसारख्या धार्मिक ग्रंथांची नावे वापरुन चित्रपट बनवण्याचे धाडस करेल का? जर केले तर सेन्सॉर बोर्ड त्याला परवानगी देईल का? मग केवळ हिंदूंच्याच धार्मिक भावना वारंवार का दुखावल्या जातात?"

तात्काळ कारवाईची मागणी

डॉ. सोळंकी यांनी निदर्शनास आणून दिले की, यापूर्वी 'द डा विंची कोड' आणि 'विश्वरुपम' यांसारख्या चित्रपटांमुळे ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्याने त्यांच्या प्रदर्शनावर अनेक राज्यांत बंदी घालण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर "सरकार आणि सेन्सॉर बोर्डाने याची तातडीने गंभीर दखल घेऊन 'मनाचे श्लोक' या चित्रपटाचे नाव हटवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी," अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पुढे सोळंकी यांनी केंद्र आणि राज्य सरकारला भविष्यात अशा प्रकारे धार्मिक प्रतीकांचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची विनंतीही केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: अडकलेली कामे मार्गी लागणार! 'या' 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राहू ग्रहाची 'युवावस्था' पालटणार नशीब

Shikhar Dhawan: बांगलादेशातील हिंदू महिलेवरील अत्याचारावर संतापला 'गब्बर'; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, "अशी हिंसा सहन केली जाणार नाही!"

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT