Maharashtra: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग केंद्रप्रदेश म्हणून घोषित करा- उद्धव ठाकरे

Maharashtra: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्नावरुन भाजप आणि एकनाथ शिंदेवर टीका केली आहे.
Udhav Thackeray
Udhav ThackerayDainik Gomantak

Maharashtra: महाराष्ट्राच्या विधानसभेत हिवाळी अधिवेशन सुरु आहे.यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी गट यांच्यात आरोप -प्रत्यारोप सातत्याने सुरु आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्नावरुन भाजप आणि एकनाथ शिंदेवर टीका केली आहे.

सुप्रिम कोर्टात हा प्रश्न प्रलंबित असूनदेखील कर्नाटकने नियमांचा भंग केला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र ( Maharashtra ) - कर्नाटक ( Karnataka ) विवादित असलेला सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा. सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जर घोषित केला तर केंद्राचे त्या प्रदेशावर लक्ष राहिल, उद्धव ठाकरेंनी आपला मुद्दा मांडला आहे. त्याचबरोबर, देव पावण्यासाठी आणि केलेले नवस फेडायला एकनाथ शिंदे सतत दिल्लीची वारी करतात , पण त्यातून प्रश्न सुटतात का ?

Udhav Thackeray
Maharashtra: मला आयुष्यातून उठवण्याचा कट- राहुल शेवाळे

त्याचबरोबर या वारीतून कर्नाटकचा प्रश्न का सुटत नाही असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका केली आहे. आता यावर सत्ताधारी पक्षाची भूमिका काय असणार आहे ते पाहणे महत्वाचे ठरते. त्याचबरोबर विरोधी पक्षाने मांडलेला हा ठराव मंजूर होणार का ते पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com