हेलिकॉप्टर Dainik Gomantak
महाराष्ट्र

हेलिकॉप्टर बनवणाऱ्या यवतमाळच्या ‘रँचो’चा मृत्यू

15 ऑगस्टला हेलिकॉप्टरचे लाँचिग करण्याचा निर्णय शेख इस्माईलने घेतला होता.

दैनिक गोमन्तक

यवतमाळ: फुलसावंगी तालुका महागाव येथील शेख इस्माईल शेख इब्राहिम (Sheikh Ismail Sheikh Ibrahim) उर्फ मुन्ना (Munna) या तरुणाने कठोर परिश्रम करून घरीच हेलिकॉप्टर (Helicopter) तयार केले. या हेलिकॉप्टरचा पंखा चाचणी उड्डाण करताना तुटला व त्याचा आघात होऊन मुन्नाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.10) रात्री फुलसावंगी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Helicopter maker Yavatmal's Rancho Alias Munna dies)

मुन्ना हा वेल्डिंग कारागीर होता. त्याच्यापाठीमागे त्याला एक भाऊ आणि एक बहीण असून,मुन्ना चा मोठा भाऊ मुस्सवीर गॅस वेल्डिंगचं काम करतो. तर वडील वृद्ध असल्याने घरीच असतात. इस्माईल हा शेख इब्राहिम यांचा लहान मुलगा होता. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. फक्त आठवीपर्यंत शिकलेला इस्माईल हा पत्रे-कारागिर होता व अलमारी, कुलर बनवायचा.

एक दिवस त्याला चक्क हेलिकॉप्टर बनविण्याची कल्पना सुचली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने हळूहळू हेलिकॉप्टरसाठी लागणारा एक एक सुटा भाग तयार कराया लागला. अथक प्रयत्नानंतर त्याचे स्वप्न साकार झाले. येत्या 15 ऑगस्टला हेलिकॉप्टरचे लाँचिग करण्याचा निर्णय त्याने घेतला.

त्यापूर्वी बनविलेल्या हेलिकॉप्टरची चाचणी मंगळवारी (10) रात्री घेण्याचा निर्णय त्याने घेतला. उड्डाणासाठी त्याने हेलिकॉप्टरचे 750 अ‍ॅम्पियरचे इंजिन सुरू केले. इथवर सर्व व्यवस्थित सुरू होते. पण, उड्डाण घेण्यापूर्वीच अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला व तो मुख्य फॅनला येऊन धडकून थेट मुन्नाच्या डोक्याला लागला. त्यात मुन्ना गंभीर जखमी होऊन हेलिकॉप्टर केबीनच्या बाहेर येऊन पडला व तेथे त्याचा जागीच मृत्यू झाला.

‘थ्री-इडियट’ या प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील विविध कल्पक वैज्ञानिक प्रयोग करणाऱ्या रँचोप्रमाणे हेलिकॉप्टर स्वतः बनवण्याचे स्वप्न तर मुन्नाचे पूर्ण झाले; पण, त्यातून उड्डाण करण्याचे स्वप्न मात्र अपघाताने अपूर्णच राहिले. बुधवारी पुसद येथे शवविच्छेदन करण्यात आल्यावर शोकाकूल वातावरणात फुलसावंगीच्या या ‘रँचो’वर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT