Gunaratna Sadavarte Dainik Gomantak
महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा अखेर तिढा सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना येत्या 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले होते. परंतु काही एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्यास नकार दिला.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यामध्ये त्यांनी पवारांच्या घरावर दगडफेक केली. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सदावर्ते यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यामध्येही सदावर्ते यांची पोलिस कोठडी न्यायालयाने कायम ठेवली. त्यातच आता सदावर्ते यांना न्यायालयाने दिलासा देत त्यांची रवानगी पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीत केली आहे. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय घमासनानंतर सदावर्ते यांच्यावरील सुनावणी पार पडली. त्यानंतर सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली.

सिल्वर ओकवरील हल्लेखोर कर्मचाऱ्यांना अनिल परबांकडून घरचा रस्ता

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांकडून अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली असून तब्बल 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून ते म्हणाले "येत्या 22 तारखेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत तसेच 22 एप्रिल पर्यंत जे कामगार कामावर रुजू होणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच दिलेल्या मुदतीपर्यंत कामावर हजर राहिल्यास त्या कर्मचार्‍यांना कोणत्याही कारवाईला सामोरे जावे लागणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty: 'मतदारसंघात आम्हालाच बोलावले जात नाही!' कुटबणबाबत क्रुझ सिल्वांचा हल्लाबोल

Goa BJP: 'पक्ष व सरकार यांच्यात समन्वय पाहिजेच'; गोवा भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची तंबी

रस्त्यांचा सुमार दर्जाच कारणीभूत! अधिकाऱ्यांबरोबर कंत्राटदारही जबाबदार; आमदार लोबो

खरी कुजबुज: रवींचे ‘एका दगडात दोन पक्षी’

Goa Crime: व्‍हिडिओ व्‍हायरल करण्‍याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक; असाहाय्य माय-लेकींवर अत्‍याचार

SCROLL FOR NEXT