Malvan Rajkot Chhatrapati shivaji Maharaj Statue Dainik Gomantak
महाराष्ट्र

Chhatrapati shivaji Maharaj Statue: 83 फूट उंच पुतळा, 2.3 टनाची तलवार, मालवण-राजकोट येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण

Malvan Rajkot Chhatrapati shivaji Maharaj Statue: मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आलं आहे.

Sameer Amunekar

मालवण: शिवप्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा ८३ फूट उंच पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (११ मे) करण्यात आले. तब्बल ८३ फूट उंच असलेल्या या पुतळ्याला तब्बल १०० वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे. यामुळे हा पुतळा भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.

या भव्य उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे राज्यातील अनेक मंत्री तसंच शिवभक्त उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, २६ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या दुर्घटनेत वादळी वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने तातडीने समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाचा व वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करत नव्यानं पुतळा उभारला आहे.

नवीन पुतळा ८३ फूट उंच आहे. शिवरायांच्या हातातील तलवार २३ फूट लांब आहे. या पुतळ्याचे वजन ८५ टन असून, तलवारीचे वजन २.३ टन आहे.

हवामानाचा अंदाज घेत हा पुतळा बनवण्यात आला आहे. या पुतळ्याला तब्बल १०० वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे. राज्यातील आणि विशेषतः कोकणातील शिवप्रेमींसाठी हा क्षण अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT