Bhagat Singh Koshyari Dainik Gomantak
महाराष्ट्र

'माझ्याकडून चूक झाली...' अखेर महाराष्ट्राच्या राज्यपालांचा माफीनामा

मागील आठवड्यात महाराष्ट्रावर वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केले होते. त्याच वादग्रस्त विधानांमुळे भगतसिंह कोश्यारी चर्चेत होते.

दैनिक गोमन्तक

मुंबई : मागील आठवड्यात महाराष्ट्रावर वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलं होतं. त्याच वादग्रस्त विधानांमुळे भगतसिंह कोश्यारी खूप चर्चेत होते. अनेक क्षेत्रातून त्यांच्यावर टिका करण्यात आली. त्यानंतर अखेर आज माझी चूक झाली म्हणत कोश्यारींनी आपल्या वक्तव्याबाबात माफी मागितली आहे. अनेकदा वादग्रस्त राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आले होते. (Bhagat Singh Koshyari Statement)

'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असे वक्तव्य करुन त्यांनी नवा वाद ओढावून घेतला होता. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत.

भारतीय राजकारणात गव्हर्नरची भूमिका दीर्घकाळापासून वादाचा विषय आहे. उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल रोमेश भंडारी यांचा वादग्रस्त निर्णय आणि त्यांच्या विरोधात अटलजींनी केलेले उपोषण, केरळचे विद्यमान राज्यपाल आरिफ मोहम्मद किंवा मध्यप्रदेशचे राज्यपाल राहिलेले राम नरेश यादव यांच्या कुटुंबीयांकडून केलेली विधाने. या सगळ्यामुळे या पदाच्या भूमिकेवर कुठेतरी प्रश्न उपस्थित होत आहेत.

अशातच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानावरून महाराष्ट्रात वादंग निर्माण झाला होता. एका कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्रातील लोकांना गुजराती आणि राजस्थानी लोकांबरोबर तुलना करून दुय्यम लेखले होते. याला महाराष्ट्रातील जनतेचा अवमान करणारे विधान म्हणत सर्वच राजकीय पक्षांनी विरोध सुरू केला होता.

एवढेच नाही तर राज्यपालांच्या विधानाशी भाजपच्या एक-दोन नेत्यांनी असहमत दाखवली. नुकतेच भाजपच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनीही राज्यपालांच्या विधानाशी असहमती दर्शवली. मात्र, कोश्यारी यांनी आपले विधान मागे घेत मराठी लोकांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'..किनारे वाचवा'! मुंबईच्या विद्यार्थिनीने पार केला गोव्याचा समुद्र; कुठ्ठाळी ते मिरामार पोहून राबवली Swim for Sea मोहीम

Goa Today Live Updates: मोपावरुन नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरु होणार!

'डिचोलीत पर्यटन सर्किट उभे राहिल'! श्री रुद्रेश्वर मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण सुरु; CM सावंतांची उपस्थिती

Blackbuck Death: धक्कादायक! 1 नाही 2 नाही... 28 काळविटांचा मृत्यू! राज्यात पहिल्यांदाच असा संसर्ग, वनमंत्र्यांनी दिले कठोर चौकशीचे आदेश

Canacona Water Problem: 8 दिवस पाण्याची टंचाई! ग्रामस्थांनी घातला सहाय्यक अभियंत्याला घेराव; मास्तीमळ येथे पाणीप्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT