मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोरोनाचा नव्या विषाणूमुळे महाराष्ट्र सरकार पुन्हा अॅक्शन मोडवर

विमानतळ (Airport) प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना याबाबत तयारीस करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिकेमधून (South Africa) कोरोनाचा (corona) स्ट्रेन पुन्हा जगभर आपली दहशत तयार करत आहे. हा विषाणू डेल्टा व्हेरियंटपेक्षा सात पटीने जास्त पसरत आहे. या ओमिक्रॉन विषाणुच्या प्रकारामुळे आता भारत सरकार आणि देशातील सर्व राज्य सरकारे सतर्क झाली आहेत. महाराष्ट्र सरकारच्या, आरोग्य विभागाने, मुंबई विमानतळ, मुंबई महापालिका प्रशासन आणि मुंबई पोलीसांना कठोर निर्बंधांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे ते सद्या रुग्णालयात आहेत. परंतू त्यांनी या विषाणुच्या नव्या स्ट्रेंनबाबत आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या धोक्यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशी रुग्णालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेत सूचना दिल्या आहेत.

ज्या देशांमध्ये कोविड विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे आता थेट मुंबईहून मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) किंवा इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांच्या पासपोर्टची तपासणी करणे, त्याचसोबत प्रवाशाची ही तपासणी व चाचणी नियमांप्रमाणे करणे, असे आदेश बीएमसी आयुक्तांनी दिलेले आहे. ज्यांना याची लागण झालेली असेल त्यांना तेथून क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या चाचणी नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करणे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे. शिवाय ओमिक्रॉन प्रकाराबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडून जी काही माहिती किंवा मार्गदर्शक तत्त्वे देण्यात येतील. त्याप्रमाणे पुढील सूचना दिल्या जातील, असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सुरक्षतेच्या सूचना:

याबाबतचे धोके लक्षात घेता, इक्बाल सिंग चहल यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची (health workers) उपलब्धता, औषधांचा साठा, ऑक्सिजनची उपलब्धता आणि प्लांटमधील उत्पादनाशी तयारी, विजेची व्यवस्था, फायर ऑडिट आणि इतर सुरक्षेसंबंधिच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री आणि बीएमसी आयुक्त यांची बैठक झाली आहे. यामध्ये विमानतळ प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना याबाबत तयारीस करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

SCROLL FOR NEXT