Khashaba Dadasaheb Dainik Gomantak
महाराष्ट्र

Khashaba Dadasaheb: गूगलने खास डूडल शेअर करत कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची 97 वी साजरी केली जयंती

गूगलनं खास डूडल तयार करुन त्यांना अभिवादन केलं आहे.

दैनिक गोमन्तक

सर्च इंजिन गूगलनं नुकतेच एक खास डूडल तयार केले आहे. कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची आज 97 वी जयंती आहे. यानिमित्तानं गूगलनं खास डूडल तयार करुन त्यांना अभिवादन केलं आहे. गूगलच्या या खास डूडलनं अनेकांचे लक्ष वेधले.

खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला. खाशाबा जाधव यांनी त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील कामगिरीने भारताचे नाव जगभरात उंचवले.

खाशाबा यांचे वडील दादासाहेब जाधव हे ख्यातनाम पैलवान होते. केडी आणि पॉकेट डायनामो या टोपणनावाने देखील खाशाबा जाधव ओळखले जात होते. त्यांच्या 97व्या जयंतीनिमित्त गूगलने (Google) खास डूडल तयार केले आहे. गूगलच्या या डूडलमध्ये कुस्तीचा आखाडा दिसत आहे. तसेच खाशाबा जाधव यांचे चित्र देखील या डूडलमध्ये दिसत आहे.

1948 मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशाबांची निवड झाली तेव्हा ते सहाव्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोहचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे भारताला (India) स्वातंत्र्योत्तर काळात मिळालेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं.

1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता. 2001 मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने (Award) सन्मानित करण्यात आलं. 1984 मध्ये एका अपघातात खाशाबा जाधव यांचे निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT