Maharashtra Kesari 2023: शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरीचा विजेता, महेंद्र गायकवाड पराभूत

शिवराज राक्षे याने 2023 महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. राक्षे याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा पराभव केला आहे.
Maharashtra Kesari 2023
Maharashtra Kesari 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

शिवराज राक्षे याने 2023 महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. राक्षे याने महेंद्र गायकवाड याचा पराभव केला आहे. (Shivraj Rakshe Won Maharashtra Kesari 2023)

मॅट विभागातून शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याला चितपट करत विजय मिळवला. पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली.

Maharashtra Kesari 2023
Mumbai High Court : पत्नीवर अत्याचार केल्यावर दूरच्या नातेवाईकांनाही बसणार भुर्दंड; ही बातमी एकदा वाचाच

महाराष्ट्र केसरीच्या माती आणि गादी विभागातील स्पर्धेत शिवराज आणि महेंद्र यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

माती विभागातील अंतिम लढत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. यात 6-4 अशा फरकाने महेंद्रने सिंकदरला मात देत फायनलमध्ये धडक दिली.

तर, मॅट विभागात शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात पार पडली. या लढतीत शिवराजने 8-1 अशा मोठ्या फरकाने सामना जिंकत फायनल गाठली.

Maharashtra Kesari 2023
Shirdi Bus Accident Video: नाशिकमध्ये खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, दहा जणांचा मृत्यू

दरम्यान, शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड दोघेही पुण्याच्या तालमीतच तयार झाले असून, वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com