Liquor Dainik Gomantak
महाराष्ट्र

Goa Made Liquor: जंगलात लपवून ठेवली दारु; चिपळूणमध्ये गोवा बनावटीचे 21.66 लाख किंमतीचे मद्य जप्त

Goa Made Liquor Seized In Chiplun: या पत्राशेडमध्ये अधिकाऱ्यांना सुमारे ३०० गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स आढळून आले. घटनास्थळी अधिकाऱ्यांना कोणताही आरोपी आढळलेला नाही.

Pramod Yadav

चिपळूण: उन्हाळी सुट्टीत कोकणात येणारे पर्यटक विचारात घेऊन जंगलात लपवून ठेवलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. चिपळूण तालुक्यातील आंबतखोल येथील जंगलात एका कंपनीच्या पत्राशेडमध्ये हा गोवा बनावटीचा हा मद्यसाठा साठवून ठेवण्यात आला होता. भरारी पथकाने हा साठा जप्त केला आहे.

चिपळूण तालुक्यातील आंबतखोल येथील जंगलात एका कंपनीच्या पत्राशेडमध्ये गोवा बनावटीचा मद्यसाठा ठेवल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी मंगळवारी (२२ एप्रिल) आंबतखोल येथील जंगलात छापा टाकला. एका कुलुपबंद पत्राशेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळून आला. या मद्यसाठ्याची किंमत २१ लाख ६६ हजार रुपये असल्याचे उघडकीस आले आहे. अधिकाऱ्यांनी हा साठा जप्त केला आहे.

या पत्राशेडमध्ये अधिकाऱ्यांना सुमारे ३०० गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स आढळून आले. घटनास्थळी अधिकाऱ्यांना कोणताही आरोपी आढळलेला नाही. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात. याच पर्यटकांना लक्ष्य करण्यासाठी हा मद्यसाठा साठवून ठेवण्यात आला असवा, असा कयास बांधला जात आहे.

गोव्यातून मद्य तस्करी रोखण्याचे आव्हान

गोव्यातून मोठ्या प्रमाणावर मद्य तस्करी विविध राज्यात सुरु असते. महाराष्ट्राची सीमा गोव्याला लागून असल्याने कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून पुढे मद्यतस्करी होत असते. अनेकवेळा पोलिस आणि अबकारी खाते तस्करीचे डाव उधळून लावण्यात यशस्वी होतात मात्र बऱ्याचवेळा तस्कर डाव साधतात. गोव्यातून महाराष्ट्रात होणारी मद्यतस्करी रोखण्याचे आव्हान राज्य पोलिस आणि अबकारी खात्यापुढे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT