
सिंधुदुर्ग: मालवण - राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ८३ फूट उंच असलेल्या शिवरायांच्या या पुतळ्याला १०० वर्षांची गॅरंटी असणार आहे. तसेच, हा पुतळ्यात २०० किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा दाब सहन करण्याची क्षमता असेल. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
मालवण - राजकोट येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. दरम्यान, २६ ऑगस्ट २०२४ रोजी हा पुतळा कोसळला. यानंतर राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीका झाली होती. सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत, समुद्रकिनाऱ्यावरील वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करुन डिसेंबर २०२४ मध्ये पुतळ्याच्या कामास सुरुवात केली. पाच महिन्यात नवीन पुतळ्याचे काम पूर्णत्वास जात आहे.
नवीन पुतळ्याबाबत महत्वाच्या बाबी
१) शिवरायांचा नवीन पुतळा ६० फूट उंच असून, त्यांच्या हातातील तलवार २३ फूट लांब आहे. अशी पुतळ्याची एकूण उंची ८३ फूट एवढी आहे.
२) पुतळ्याचे एकूण वजन ८५ टन आहे तर शिवरायांच्या हातातील तलवार २.३ टनाची आहे.
३) ब्राँझ धातूपासून निर्माण करण्यात आलेला हा पुतळा २०० किमी प्रतितास वाऱ्याचा दाब सहन करु शकतो.
४) नव्याने उभारण्यात आलेला पुतळ्याची १०० वर्षांची गॅरंटी असेल.
५) शिवरायांच्या नव्या पुतळ्यासाठी २४ कोटी रुपये खर्च आला आहे.
एक मे रोजी उद्घाटन होण्याची शक्यता
नामवंत मूर्तीकार राम सूतार आणि पुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, येत्या ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुतळ्याचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुतळ्याचे उद्घाटन करतील. दरम्यान, उद्घाटनाच्या तारखेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पुतळा कोसळल्यानंतर झाली होती टीका
मालवण - राजकोट येथे उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ०४ डिसेंबर २०२३ रोजी नौसेना दिनी उद्घाटन झाले होते. नऊ महिन्यात २६ ऑगस्ट २०२४ रोजी हा पुतळा कोसळल्याने सर्वस्तरातून भाजप सरकारवर टीका करण्यात आली होती. दुर्दैवी घटना म्हणत राजकीय नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.