Singing Dainik Gomantak
महाराष्ट्र

कलेला प्राधान्य देत रिक्षाचालकाने लातूरकरांना केले मंत्रमुग्ध

कुठलेही क्लासेस न करता स्वतः बालाजी यांनी प्रॅक्टिस करत हे गीत गायले हे विशेष. त्यामुळे सोशल मीडियावर या रिक्षावाल्याच मोठं कौतुक होत आहे.

दैनिक गोमन्तक

शहरात रिक्षा चालवत असलेला एक तरुण त्याच्या गायकीमुळे लातूर शहर आणि परिसरात चांगलाच चर्चेत आला आहे. कोणाकडूनही गायिकेचे धडे न घेता स्वतःचा छंद जोपासत बाहुबली चित्रपटातील 'कोण है ओ कोण है....कहा से ओ आया...' अशी अवघड गाणी गाऊन (Singing) बालाजी कांबळे हा रिक्षाचालक लातूरकरांना मंत्रमुग्ध करतो. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आणि त्यात गायनाची आवड जोपासणारा बालाजी कांबळे नावाचा 34 वर्षीय बालाजी कांबळे हा युवक लातूर शहरातील पाखरसांगवी भागात राहतो.

लहानपणापासून गाणे गाण्याची आवड या युवकास होती. कैलास खेर यांनी गायलेले बाहुबली चित्रपटातील कोण है ओ... ह्या गाण्याचा उच्चार कठीण आहेत. अशात बिहार येथील एका युवकाने कैलास खेर यांच्याप्रमाणेच हे गीत गाऊन वाहवा मिळविली. मग आपण हे गीत का गाऊ शकत नाही, ही जिद्द बालाजी यांच्यात आली. त्यावरून त्यांनी हे गाणे गायले अन सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केले. या व्हिडिओला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

रिक्षा चालवत चालवत बालाजी गाणे गातात, त्यांचे रिक्षातील प्रवाशीही गाणे ऐकून बालाजीचे भरभरुन कौतुक करतात. बाहुबली चित्रपटातील हे अवघड गीत गाऊन बालाजी यांनी लातूर (Latur) आणि परिसरात आपली ओळख निर्माण केली आहे. कुठलेही क्लासेस न करता स्वतः बालाजी यांनी प्रॅक्टिस करत हे गीत गायले हे विशेष. त्यामुळे सोशल मीडियावर या रिक्षावाल्याच मोठं कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

Mumbai Indians: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! महेला जयवर्धनेनं सोडलं मुख्य प्रशिक्षकपद; IPL 2027 आधी मोठा बदल

Organic Agriculture: गोव्यात 10 टक्के क्षेत्रातही सेंद्रिय शेती नाही! रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सांगत उदय प्रभुदेसाई यांचे आवाहन

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT