girl dies after falling from running Express in Thane dainik gomantak
महाराष्ट्र

ठाण्यात भरधाव एक्स्प्रेसमधून पडून तरुणीचा मृत्यू

या सगळ्या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Latest News: ठाणे येथील एका 16 वर्षीय मुलीचा वेगवान एक्सप्रेस ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. डोंबिवलीजवळ हा अपघात झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले की, मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत पवन एक्स्प्रेसने प्रवास करत होती. त्यानंतर अचानक तिची तब्येत बिघडली, त्यानंतर ती बोगीच्या दारात गेली. मात्र तिथे तिचा तोल गेला आणि ती ट्रेनमधून खाली पडली. (girl dies after falling from running Express in Thane)

मुलगी बिहारमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघात होताच मुलीच्या पालकांनी तात्काळ ट्रेनची चेन ओढली. डोंबिवली रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबल्यावर ते अपघातस्थळी गेले असता त्यांना मुलगी रुळांवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

पोलिसांनी सांगितले की, डोंबिवली रेल्वे पोलिसांनी मुलीला तत्काळ रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत (Death) घोषित केले. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

SCROLL FOR NEXT