Ganpati Special Train List 2025 Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ganpati Special Train List: चाकरमान्यांनो, चला गणपतीक गावाक जाऊचा असा... मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची यादी जाहीर, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

Central Railway Ganpati Special Trains List: गणेश चतुर्थीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून दिलासा देणारी बातमी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

Sameer Amunekar

Central Railway has announced the list of Ganpati Special Trains for 2025

गणेश चतुर्थीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून दिलासा देणारी बातमी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची यादी जाहीर केली आहे.

मुंबई, पुणे व लोकमान्य टिळक टर्मिनसह विविध स्थानकांवरून कोकण मार्गावर आणि गोव्याकडे धावणाऱ्या या विशेष गाड्या २२ ऑगस्टपासून विविध तारखांना चालवण्यात येणार आहेत.

सीएसएमटी–सावंतवाडी मार्गावरून दररोज धावणाऱ्या गाड्या व त्यांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच सीएसएमटी–रत्नागिरी, एलटीटी–सावंतवाडी, एलटीटी–मडगाव, पुणे–रत्नागिरी या मार्गांवरही विशेष गाड्या चालणार आहेत.

सीएसएमटी–सावंतवाडी रोड दैनिक विशेष ट्रेन (४० सेवा)

०११५१ विशेष गाडी सीएसएमटी येथून २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री १२.२० वाजता सुटणार असून, ती त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर ०११५२ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून २२ ऑगस्टपासून दररोज पहाटे ३.३५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.

सीएसएमटी–सावंतवाडी रोड –सीएसएमटी दैनिक विशेष ट्रेन (३६ सेवा)

०११०३ विशेष गाडी सीएसएमटी येथून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी ३.३० वाजता सुटेल (१८ सेवा) आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री ४ वाजता पोहोचेल. ०११०४ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान रोज पहाटे ४.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ४.४० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

याशिवाय, सीएसएमटी–रत्नागिरी दरम्यानदेखील विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. ०११५३ विशेष गाडी सीएसएमटी येथून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत दररोज सकाळी ११.३० वाजता सुटेल (१८ सेवा) आणि त्याच दिवशी रात्री ८.१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. परतीसाठी ०११५४ विशेष गाडी रत्नागिरी येथून २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी ४ वाजता सुटेल व दुपारी १.३० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

एलटीटी-सावंतवाडी रोड दैनिक विशेष ट्रेन (३६ सेवा)

०११६७ विशेष गाडी एलटीटी येथून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री ९ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

०११६८ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी ११.३५ वाजता सुटेल व रात्री १२.४० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.

एलटीटी-सावंतवाडी रोड दैनिक विशेष ट्रेन (३६ सेवा)

०११७१ ही विशेष ट्रेन एलटीटीहून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ०८.२० वाजता दररोज सुटेल (एकूण १८ सेवा) आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री २१.०० वाजता पोहोचेल. ०११७२ ही ट्रेन सावंतवाडीहून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत दररोज २२.३५ वाजता सुटेल (एकूण १८ फेऱ्या) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता पोहोचेल.

एलटीटी – सावंतवाडी रोड-एलटीटी (साप्ताहिक विशेष ट्रेन) -६ सेवा

०११२९ साप्ताहिक विशेष ट्रेन दि. २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी एलटीटी येथून सकाळी ०८.४५ वाजता सुटेल (एकूण ३ सेवा) आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता पोहचेल.

०११३० ही विशेष ट्रेन २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी सावंतवाडी रोड येथून २३.२० वाजता सुटेल (एकूण ३ सेवा) आणि एलटीटीला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल.

एलटीटी-मडगाव-एलटीटी -४ सेवा

०११८५ ही साप्ताहिक विशेष ट्रेन २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी एलटीटी येथून रात्रौ १२.४५ वाजता सुटून (२ सेवा) आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता सुटेल.

०११८६ ही साप्ताहिक विशेष ट्रेन २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून एलटीटी येथे सकाळी ४.५० वाजता पोहचेल.

एलटीटी-मडगाव-एलटीटी (एसी विशेष ट्रेन) - ६ सेवा

०११६५ एसी साप्ताहिक विशेष ट्रेन २६ ऑगस्ट २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी एलटीटी येथून ००.४५ वाजता सुटेल (३ सेवा) आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी १४.३० वाजता पोहोचेल. ०११६६ एसी साप्ताहिक विशेष ट्रेन मडगाव येथून प्रत्येक मंगळवारी २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी १६.३० वाजता सुटेल (३ सेवा) आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०४.५० वाजता पोहोचेल.

पुणे -रत्नागिरी साप्ताहिक विशेष ट्रेन (६ सेवा)

०१४४७ साप्ताहिक विशेष ट्रेन २३ ऑगस्ट,३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी पुण्याहून दुपारी रात्रौ १२.२५ वाजता सुटून रत्नागिरीत त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल. ०१४४८ साप्ताहिक विशेष ट्रेन २३, ३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी ५.५० सुटून पुण्यात दुसऱ्या दिवशी ५ वाजता पोहचेल.

पुणे -रत्नागिरी एसी साप्ताहिक विशेष ट्रेन (६ सेवा)

  • ०१४४५ एसी साप्ताहिक विशेष ट्रेन २६ ऑगस्ट,२ व ९ सप्टेंबर रोजी पुणे येथून ००.२५ वाजता सुटून रत्नागिरीत त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल.

  • ०१४४६ एसी साप्ताहिक विशेष ट्रेन २६ ऑगस्ट, २, ९ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून १७.५० वाजता सुटून पुण्यात दुसऱ्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल.

    दिवा–चिपळूण– दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्या (३८ सेवा)

  • ०११५५ मेमू विशेष गाडी दिनांक २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दिवा येथून दररोज ०७.१५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.

  • ०११५६ मेमू विशेष गाडी दि. २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान चिपळूण येथून रोज १५.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.५० वाजता दिवा येथे पोहोचेल.

गणपती आणि चाकरमानी यांचं नातं अतूट आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागांतून चाकरमानी कोकणातील आपल्या गावाकडे येतात. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी ते मोठ्या उत्साहाने गावाकडे रवाना होतात.

चाकरमान्यांची ही गर्दी लक्षात घेऊन दरवर्षी रेल्वे प्रशासनाकडून कोकणमार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन केले जाते. या गाड्या नेहमीच्या रेल्वे सेवा आणि लोकल्सव्यतिरिक्त असतात, ज्यामुळे चाकरमान्यांना सहजगत्या आणि सुरक्षित प्रवास करता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Landslide: वाडे-वास्‍कोत कोसळली दरड! घराला धोका; कुटुंब जगतेय भीतीच्‍या छायेखाली

Goa Politics: काँग्रेस,‘आप’मधील दरी वाढणार! निरीक्षकांचा अंदाज; ‘झेडपी’त दोन्ही पक्ष स्वबळाच्या तयारीत

Goa Tourism: गोव्यात 54 लाख पर्यटक! सहा महिन्यात विक्रमी भरारी; पर्यटनाचा नवा उच्चांक नोंद

Goa Politics: खरी कुजबुज; पेडण्यातली भुताटकी

Forced Conversion: हातात AK47 घेऊन फोटो! सक्तीने 'धर्मांतरण' करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातील महिलेसह 10 जणांना अटक

SCROLL FOR NEXT