Ganesh Chaturthi travel cost Konkan:कोकणातल्या चाकरमान्यांना गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. मुंबई-ठाण्यातील गणेशभक्तांचा बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणाकडे होणारा वार्षिक महाप्रवास काही नवीन नाही, पण दरवर्षीप्रमाणे यंदाही वाहतुकीचा गोंधळ हा सर्वात मोठा अडथळा ठरणार का, हा प्रश्न उभा आहे. राखीपौर्णिमेच्या दिवशी मुंबई, ठाणे आणि पुण्यात वाहतूक कोंडीने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तासन्तास रस्त्यात अडकून प्रवासाचा आनंद किरकोळ होतो, अशी स्थिती पुन्हा होऊ नये, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.
यावर्षीही परिस्थिती फारशी वेगळी नसेल, कारण मुंबई-गोवा महामार्गावर अद्याप खड्ड्यांची चाळणच आहे. त्यामुळे वाहन प्रवासाला अतिरिक्त वेळ लागणार हे निश्चित. अशा वेळी कोकणात बाप्पाच्या उत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांचा अधिकांश वेळ हा प्रवासातच खर्च होणार आहे. परिणामी, यंदा गणपतीसाठी कोकणात कसे जायचे हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी अनेकजण विमान प्रवासाला प्राधान्य देतात. विमानाने मुंबईहून गोवापर्यंत किंवा कोकणातील इतर विमानतळांपर्यंत काही तासांत पोहोचता येते, हीच आशा ठेवून तिकीट बुक केले जाते. मात्र, यंदा विमान प्रवासाचे दर चाकरमान्यांच्या बजेटला चांगलेच झळकावणारे ठरत आहेत.
सध्या कोकणात जाण्याचा विमान प्रवास हा थायलंड, सिंगापूर किंवा दुबईला जाण्यापेक्षाही महाग झाला आहे. दुबईला जाण्यासाठी सर्वात स्वस्त विमानाचे तिकीट १३ हजार रुपयांच्या आसपास आहे.
स्पाईस जेटचे तिकीट १६ हजार, तर एअर इंडियाचे तिकीट १८ हजारांहून अधिक आहे. पण, २६ ऑगस्ट रोजी म्हणजेच गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी स्पाईस जेटच्या मुंबई-गोवा विमानाचे तिकीट तब्बल २१ हजार रुपयांवर पोहोचले आहे. तर काही तिकीटं ही 4 हजार, 7 हजार किंवा 10 हजारांदरम्यानही खरेदी करता येणार आहेत.
ऐरवी ३ हजार रुपयांच्या आसपास असलेले हेच तिकीट आता सात पटीने वाढून मिळत आहे. परिणामी, कोकणात बाप्पाच्या भेटीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदा केवळ प्रवासासाठीच अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे, महामार्गावरील खड्डे की विमान प्रवासाचे दर यापैकी कोणता अडथळा पार करायचा, हा नवा ‘द्विधा’चा प्रश्न गणेशभक्तांसमोर उभा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.