Ghumat Aarti: स्वातंत्र्यपूर्व काळापासून कारवारहून सोलापुरात स्थायिक झालेला दैवज्ञसमाज मूळची आपली गोमंतकीय संस्कृती आजही जूपन आहे. सोलापूरमध्ये सराफी व्यावसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेली दोनशे कुटुंबे आजही आपल्या पंरपरा उराशी बाळगून असून या गशोत्सव मंडळाच्या उत्सवावर संपूर्ण कोकणी प्रथांचा प्रभाव आहे. या गणपतीसमोर रोजची आरती घुमट, शिंबळ, ताशाच्या गजरात होते.
1974 साली दैवज्ञ समाज गणेशोत्सव मंडळतर्फे गणेश उत्सवास प्रारंभ केला. सोलापूर शहरातील तुळजापूर वेस परिसरात दैवज्ञ समाज सांस्कृतिक भवन येथे या मंडळाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशोत्सवाची सजावट पूणपर्ण पर्यावरणपूरक पद्धतीची असून यंदा पत्रावळी व द्रोणाचा वापर करून सजावट करण्यात आली आहे. आरतीसाठी घुमट, ताशा, शिंबळ, झांज या वाद्याचा वापर केला जातो. यासाठी कारावार येथून वाद्य मागवली जातात. आरती म्हणण्याचा पद्धतही कोकणी पद्धतीनेच ठेक्यात म्हटली जाते.
स्वातंत्र्यपूर्व काळात सराफी व्यवसाय करण्यासाठी दैवज्ञ समाजातील काही कुटुंबे कारवार परिसरातून सोलापुरात स्थायिक झाली. वेर्णेकर, रेवणकर, पालनकर, कुडतरकर, शिरोडकर, अणवेकर, गोकर्णकर, रायकर, गावकर, कुर्डेकर, बायकेरीकर आदी कुटुंबाचा यात समावेश आहे.
येथील सामाजिक व सांस्कृतिक परंपराशी ते पूर्णपणे एकरूप झाले असले तरी, मूळ कोकणी भाषा, संस्कृती व परंपरा आजही ते जपत आहेत. घरात अजूनही कोकणी भाषेचा वापर केला जातो. कोकणी पंरपरा जपण्यासाठी समाजाच्यावतीने एक लाख रूपये वर्गणी स्वरूपात जमा करून तुळजापूर वेस परिसरातील पाच गुंठे जागा 1982 मध्ये खरेदी करण्यात आली. तेव्हापासून या जागेवर गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
* प्रसाद म्हणून पंचखाद्य
दैवज्ञ समाज गणेशोत्सव मंडळाकडून नियमित आरतीसाठी पंचखाद्य, वेलची केळी व मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात येते. नारळ किसून त्यात मूग दाळ, तूप, गुळ घालून कोकणी पद्धतीने पंचखाद्य बनविले जाते. रोज दुपारी घुमट आरतीनंतर तसेच सांयकाळीच्या पुजेनंतर पंचखाद्याचे वाटप केले जाते.
* पर्यावरणपूरक सजावट व मोटोळी
या गणेशोत्सवाकडून प्रतिवर्षी पर्यावणपूरक सजावट केली जाते. यंदाही गणपतीच्या सजावटीसाठी द्रोण व पत्रावळीचा वापर केलेला आहे. या गणेशोत्सवाचे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे गणपतीच्या डोक्यावर गोवा, कोकणाप्रमाणे माटोळी बांधण्यात आली आहे. सोलापुरात उपलब्ध असणारी फळे माटोळीला बांधली जातात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.