मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai) दुबईहून आलेल्या एका परदेशी महिलेकडून लाखोंचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी महिलेला संशयावरून थांबवून तिची चौकशी केली असता तिच्या पोटातून 214 ग्रॅम हेरॉईनचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 10 लाख रुपये आहे. (foreign national arrested at Mumbai Airport)
महिलेच्या पोटातून 20 कॅप्सूल जप्त
एक महिला अशा प्रकारे ड्रग्जचा पुरवठा करणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती, त्यानंतर दुबईहून आलेल्या महिलेला थांबवून प्रथम तिच्या बॅगची झडती घेण्यात आली, मात्र डीआरआयला त्यातून काहीही मिळाले नाही. तिच्या शरीराची तपासणी केली असता तिच्या पोटातून 20 कॅप्सूल सापडले. डीआरआयने त्या कॅप्सूलची तपासणी केली असता ते हेरॉईनचे ड्रग्ज असल्याचे आढळून आले.
पोलीस तपासात गुंतले
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला अटक करण्यात आली असून तिची चौकशी करण्यात येत आहे. हे ड्रग्ज ती कोणाला आणि कुठे पुरवत होती, हे त्या महिलेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच तिच्या पोटात ड्रग्ज टाकण्यास कोणी मदत केली याचाही तपास घेणे सुरू आहे. महिलेच्या फोनचाही शोध घेण्यात येत असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.