jalna clashes ANI
महाराष्ट्र

जालन्यात दोन गटात झालेल्या दगडफेकीत 5 पोलीस जखमी

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका गावात दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. दगडफेकीच्या या घटनेत 5 पोलीस जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. मात्र पाहता पाहता प्रकरण पेटले आणि मोठा राडा झाला. पोलिसांनी या प्रकरणी 20-25 आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावात प्रवेश करणार होती. आणि ज्या ठिकाणी ती मुर्ती बसवणार होते त्याला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात येणार होते, मात्र या विषयावर चर्चा न होता दोन समाजात वाद निर्माण झाला. वाद इतका वाढला की दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या.दरम्यान पोलिसांनी सुमारे 20 ते 25 जणांना अटकही केली आहे. चांदई येथे दोन गटात हाणामारी झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच आरोपींवर कडक कारवाईची तयारी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT