FIR Under MCOCA Against The Lawyer Satish Ukey Who Filed The Case Against Devendra Fadnavis. Dainik Gomantak
महाराष्ट्र

Devendra Fadnavis यांच्यावर खटला दाखल करणाऱ्या वकील अन् कुटुंबियांवर मकोका अंतर्गत एफआयआर

Satish Ukey: सामाजिक कार्यकर्ते सतीश उईके हे मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. उईके यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.

Ashutosh Masgaunde

FIR Under MCOCA Against The Lawyer Satish Ukey Who Filed The Case Against Devendra Fadnavis:

मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात बंद असलेल्या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्ये सतिश उईके यांच्याविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उईके यांचा भाऊ, पत्नी आणि इतर नातेवाईकांसह याच प्रकरणी अन्य सहा जणांविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

कोण आहेत सतीश उईके?

वकील आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश उईके हे मुंबईतील आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) बंद आहेत.

उईके यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपविल्याचे सांगत त्यांनी स्थानिक न्यायालयात फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती.

याशिवाय न्यायमूर्ती बीएच लोया यांच्या गूढ मृत्यूबाबत शंका उपस्थित करत उईके यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली होती.

माजी न्यायमूर्ती लोया (Judge BH Loya) सोहराबुद्दीन शेखच्या बनावट चकमक (Sohrabuddin Encounter) प्रकरणाची सुनावणी करत होते. या प्रकरणात गृहमंत्री अमित शहा आरोपी होते. 2014 मध्ये लग्न समारंभात सहभागी होत असताना लोया यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

या आरोपांवरून गुन्हा दाखल

नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे विभागीय अभियंता पंकज पाटील यांनी उईके यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर मंगळवारी उईके आणि इतर सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या सात जणांनी मिळून मूळ विठ्ठल ढवळे यांच्या मालकीच्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. सध्या, 1990 च्या पासून ते नागरी प्राधिकरणाच्या मालकीचे आहे.

गेल्या वर्षी, ईडीने (ED) उईके आणि त्याचा भाऊ प्रदीप यांना ११.५ कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात अटक केली होती. दोघेही एप्रिल २०२२ पासून मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात बंद आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT