Case Filled Against Raj Thackeray in Aurangabad Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय घडामोडी मागील काही दिवसांपासून लाऊडस्पीकर वादाभोवती फेर धरत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील राजकारण हदरवून सोडले होते. यानंतर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद (Aurangabad) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Filed a case against Raj Thackeray in Aurangabad)

दरम्यान, लाऊडस्पीकरच्या मुद्याने महाराष्ट्रासह (Maharashtra) उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील राजकारण ढवळून निघालं. या मुद्यावरुन राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरली असल्याचा आरोप देखील राजकीय विरोधकांकडून करण्यात आला होता. जोपर्यंत मशिदीवरुन लाऊडस्पीकर हटवले जात नाहीत, तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही, असे आवाहन राज ठाकरेंनी राज्य सरकारलं केलं होतं. त्यानंतर सत्ताधारी नेते आणि मनसेमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या. राज ठाकरे भाजपची बी टीम असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून राज ठाकरे यांच्यावर करण्यात आला. यातच राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये (Aurangabad) रविवारी सभा पार पडली. ज्याकडे महाराष्ट्रातील तमाम मनसैनिकांचा लक्ष लागलं होतं. राज ठाकरेंनी या सभेतून चार तारखेपर्यंत मशिदीवरुन लाऊडस्पीकर हटवण्यात यावेत असे आवाहन देखील केले होते.

राज ठाकरे (Raj Thackeray) औरंगाबाद सभेत म्हणाले होते की, ''इथे जमलेल्या तमाम मन सैनिकांना कामगार दिनाच्या शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज्यातील विरोधकांनी आमच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर मी गुढीपाडव्याच्या सभेला उत्तर म्हणून उत्तर सभा घेतली, त्यानंतरही राज्यातील विरोधकांनी माझ्यावर टीका केली. आता मी राज्यातील प्रत्येत जिल्ह्यात सभा घेणार आहे. त्यामुळे ज्यांना काही रोखायचं असेल त्यांनी रोखून दाखवावं. महाराष्ट्रात आज अनेक समस्या आहेत. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचं प्रश्न आवासून आपल्या समोर उभा आहे. आज या संभाजीनगरमध्येही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आज मी आपल्या समोरच्या समस्यांनाच घेऊन बोलणार आहे. ज्यांनी महाराष्ट्राचा इतिहास विसरला त्यांच्या पायाखालून महाराष्ट्राचा भूगोल देखील निसटून गेला. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास आपण पुन्हा एकदा नव्याने समजून घेतला पाहिजे. तसेच, मनसेच्या सभेमध्ये वेडं वाकडं करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा चौरंग केला जाईल. त्याचबरोबर भाषणात व्यत्यत आणणाऱ्याला तिथेच हाणा.''

राज ठाकरे सभेदरम्यान म्हणाले होते की, ''छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने आपल्याला स्वराज्याचा अर्थ समजवला. स्वाभीमानानं कसं जगायचं हे देखील आपल्याला महाराजांनी शिकवलं. औरंगजेबाला त्यावेळी खऱ्या अर्थाने कळालं होतं की, छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर विचार आहे. मात्र आज आपण या महापुरुषांच्या केवळ जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करतोय. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या समोर मांडला.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT