Sharad Pawar Showed Great Responsibility To Rohit Pawar
Sharad Pawar Showed Great Responsibility To Rohit PawarDainik Gomantak

शरद पवारांनी नातवावर दाखवला विश्वास! रोहित पवारांना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी रोहीत पवार यांच्यावर सोपवली.
Published on

महाराष्ट्राचे राजकारण आणि पवार कुटूंब हे समिकरण चांगलेच दृढ झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता तिसरी पिढी उतरली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)अजित पवार आणि यानंतर रोहीत पवारअश्या पध्दतीने पवार कुटंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत रोहीत पवार यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. यात त्यांना चांगले यश मिळाले आहे. यानंतर आता रोहित पवार यांच्यावर शरद पवार यांनी नवीन जबाबदारी दिली आहे. (Sharad Pawar Showed Great Responsibility To Rohit Pawar)

Sharad Pawar Showed Great Responsibility To Rohit Pawar
ऑनलाईन गेमने घेतला 14 वर्षीय मुलाचा जीव

गेल्या विधानसभा निवडणूकीत (Election) कर्जत जामखेड मतदारसंघामधून रोहित पवार यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. तसेच रोहित पवार तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. नगरपंचायत निवडणुकीतील जबाबदारी यशस्वीरितीने पार पडल्यामुळे रोहित पवारांवरील विश्वास वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळेच रोहित पवार यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. यातच रोहित पवार यांनी एक ट्विट करत यासंर्भातील माहिती दिली आहे.

पाच विधानसभा निवडणुकांची जबाबदारी

शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी रोहीत पवार यांच्यावर सोपवली. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार, आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावर पुढिल सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील 15 ते 17 महानगरपालिकाच्या निवडणूका होणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या ही निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठीच भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडे दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com