Mumbai News: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये सीटवरुन काही महिलांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'ठाणे-पनवेल' लोकलच्या महिला कक्षात महिला प्रवाशांमध्ये भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, महिला (Women) ट्रेनमध्ये एकमेकांचे केस ओढताना दिसत आहेत. एका लेडी कॉन्स्टेबलने प्रवाशांना (Passengers) शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले आणि त्या जखमी झाल्या.
तसेच, वाशी रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस कटारे म्हणाले की, “वाशी रेल्वे स्थानकावर ठाणे (Thane) ते पनवेल लोकल ट्रेनमध्ये 3 महिलांमध्ये हाणामारी झाली. सीटवरुन वाद झाल्यानंतर काही महिलांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एक महिला कर्मचारी जखमी झाली.''
शिवाय, या घटनेची माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'ठाण्याहून लोकल ट्रेनमध्ये चढलेली एक वृद्ध महिला आणि तिची नात कोपरखैरणे येथे ट्रेनमध्ये सीट रिकामी होण्याची वाट पाहत होते. सीट रिकामी होताच वृद्ध महिलेने नातीला बसण्यास सांगितले. दुसरीकडे, दुसऱ्या महिलेनेही सीटवर बसण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले.' मारहाणीत सहभागी असलेल्या महिलांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.