ESakal Comscore Dainik Gomantak
महाराष्ट्र

Comscore: मराठी मनाचा 'ESakal'वरच भरोसा! डिजिटल पत्रकारितेत पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व, 5.6 कोटी युजर्ससह 'नंबर वन'

ESakal: ई-सकाळ डॉट कॉमने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट पत्रकारितेची आणि डिजिटल माध्यमातील वर्चस्वाची मोहोर उमटवली आहे.

Sameer Amunekar

ESakal number 1 Marathi News Website

पुणे: ई-सकाळ डॉट कॉमने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट पत्रकारितेची आणि डिजिटल माध्यमातील वर्चस्वाची मोहोर उमटवली आहे. 'कॉमस्कोर' (Comscore) या जागतिक स्तरावर मानल्या जाणाऱ्या संस्थेने डिसेंबर २०२५ ची ताजी आकडेवारी प्रसिद्ध केली असून, यामध्ये 'ई-सकाळ' (eSakal.com) ने ५.६ कोटी कोटी युजर्ससह मराठी डिजिटल न्यूज इकोसिस्टममध्ये 'नंबर १' चे स्थान पटकावले आहे.

आजच्या युगात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर माहितीचा महापूर आलेला असताना, वाचकांसाठी 'सत्यता' पडताळणे कठीण झाले आहे. अशा काळात ५.६ कोटी युजर्सनी 'ई-सकाळ'ला दिलेली पसंती ही केवळ आकडेवारी नसून तो सकाळने जपलेल्या मूल्यांचा विजय आहे. दशकांपासून प्रिंट मीडियामध्ये अग्रस्थानी राहिलेल्या सकाळने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत, डिजिटल जगातही आपली गुणवत्ता टिकवून ठेवली आहे.

मराठी भाषिकांची पहिली पसंती

'ई-सकाळ'ने आपल्या दर्जेदार मजकुराच्या जोरावर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील मराठी भाषिक वाचकांना एका व्यासपीठावर आणले आहे. ताज्या घडामोडी, सखोल विश्लेषण आणि अचूक माहिती या त्रिसूत्रीमुळेच सकाळने आपला हा नवा इतिहास रचला आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला विश्वासाचा हा वारसा आता डिजिटल युगात अधिक विस्तारत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

वाचकांचे प्रेम, गुणवत्तेला प्राधान्य

मराठी वाचक आजही बातम्यांच्या सत्यतेला सर्वोच्च प्राधान्य देतो, हे सकाळच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आधुनिक युगातील तंत्रज्ञान आणि सकाळचा पारंपरिक विश्वासार्ह वारसा यांची सांगड घातल्यामुळेच 'ई-सकाळ'ने इतर सर्व स्पर्धकांना मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे.

सकाळ माध्यम समूहाअंतर्गत दैनिक गोमन्तक, अॅग्रोवन, साम, सरकारनामा यांसारख्या लोकप्रिय वेबसाइट्सचा समावेश असून, या सर्व प्लॅटफॉर्म्समुळे समूहाची डिजिटल पोहोच मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT