University of Mumbai Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai University : मराठीतून दिले जाणार इंजिनिअरींगचे शिक्षण

मुंबई विद्यापीठात (University of Mumbai) या शैक्षणिक (Education) वर्षांपासून विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई : मंगळवारी मुंबई विद्यापीठाची (University of Mumbai) विद्यापरिषद बैठक पार पडली. या परिषदेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबई विद्यापीठात या शैक्षणिक वर्षांपासून विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात करण्यात येत आहे. विद्यापीठ पातळीवर विविध विषयांना एका छताखाली आणण्यासाठी स्कूल संकल्पना राबवली जाणार आहे. विविध विद्याशाखाअंतर्गत विषयांची ओळख आणि ते विषय शिकण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार अशी शक्यता आहे. शिवाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखाअंतर्गत अभियांत्रिकीच्या शिक्षणात मोठा बदल घडून येणार आहेत. क्षेत्रीय भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याच्या एआयसीटीच्या शिफारशीला कालच्या विद्या परिषदेमध्ये मंजूरी देण्यात आली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सलंग्नित महाविद्यालयांमध्ये आता लवकरच मराठी भाषेमध्ये अभियांत्रिकेचे शिक्षण दिले जाणार आहे. (Engineering education will be given in Marathi language at Mumbai University)

स्कुल संकल्पनेमध्ये स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस, स्कूल ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस आणि स्कूल ऑफ पर्फॉर्मिंग आर्ट्स अशा विविध स्कूल्सची स्थापना करण्यासाठी काल झालेल्या विद्या परिषदेमध्ये मंजूरी देण्यात आली. त्याचबरोबर औद्योगिक गरजा लक्षात घेऊन अभियांत्रिकीच्या आठ शाखांमध्ये नवीन विषयांच्या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. ज्यामध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड डेटा सायन्स, आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (डेटा सायन्स), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी इन्क्ल्युडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी) अशा विविध अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. कोरोनामुळे महाविद्यालय बंद असताना ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांचे सुरु आहे. याशिवाय, ऑनलाइन परीक्षा सुद्धा विद्यापीठाने व्यवस्थित पार पाडल्या आहेत. म्हणून आता त्यानुसार विद्यार्थी, शिक्षक आणि इतर सर्व शैक्षणीक घटकांना लक्षात घेऊन त्याचबरोबर शैक्षणिक वर्षाची घडी सुरळीत बसविण्यासाठी शैक्षणिक सत्र निश्चित करण्यात आले आहे.

यानुसार कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठी 14 जून ते 30 ऑक्टोबर 2021 हे प्रथम सत्र आणि 15 नोव्हेंबर ते 1 मे 2022 हे दुसरे सत्र निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये दिवाळी, नाताळ, आणि गणपती सणांच्या सुट्ट्यांचे विशेष नियोजन करण्यात आले. तसेच पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात 12 जून 2022 पासून होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Final: तगड्या मास्टरप्लॅनची गरज! WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला पुढील 9 पैकी किती सामने जिंकावे लागणार?

Sheikh Hasina: फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीना यांना कोर्टाचा मोठा झटका, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुनावली 21 वर्षांची शिक्षा; अवामी लीगचा राजकीय षडयंत्राचा आरोप

Goa Cabinet Decision: खाण व्यवसायाला दिलासा! ट्रकसाठी रस्ता कर सवलत आता 2027 पर्यंत वाढवली; वाचा गोवा मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

SCROLL FOR NEXT