महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, 13 ऑक्टोबरला मतदान

14 ऑक्टोबरला मतमोजणी

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमधील 1166 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यासाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार असून, 14 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले आहे. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे.

महत्वाच्या तारखा

- 13 सप्टेंबर 2022 रोजी संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.

- निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 21 ते 27 सप्टेंबर दरम्यान दाखल करता येतील. मात्र, 24 आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही.

- अर्जांची छाननी 28 सप्टेंबर 2022 रोजी पार पडणार आहे. तर, 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे.

- ग्रामपंचायती निवडणुकीचे मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पार पडणार आहे. मतमोजणी दुसऱ्याच दिवशी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या:

ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जव्हार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70. रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1. रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10. सिंधुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवगड- 2. नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71. नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.

पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1. सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6. कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1. अमरावती: चिखलदरा- 1. वाशीम: वाशीम- 1. नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8. वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7. चंद्रपूर: भद्रावती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1. भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1. गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2. गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1. एकूण- 1,166.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT