Shiv Sena Dainik Gomantak
महाराष्ट्र

Shiv Sena Symbol: मोठी बातमी! शिवसेनेचे पक्ष चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले

Shiv Sena: शिवसेनेचे पक्ष चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Shiv Sena Symbol: महाराष्ट्रात शिवसेना कुणाची असा प्रश्न मागील काही दिवसांपासून विचारला जात होता. मात्र आता शिवसेनेचे पक्ष चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचे (Shiv Sena) धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटाला हे चिन्ह वापरता येणार नाही. विशेष म्हणजे, दोन्ही गटांना शिवसेना पक्षाचे नाव देखील वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळत आहे.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने आज त्यांच्याकडील महत्त्वाची कागदपत्रे आयोगाला सादर केली होती. शिवाय अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये शिंदे गटाचा कोणताही उमेदवार नाही मग पक्ष चिन्ह का मागतायत असा सवाल देखील ठाकरे गटाने आयोगासमोर केला होता.

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अद्याप उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर दावा केलेला नाही. दिल्लीमध्ये आमच्याकडे तब्बल दहा लाखांपेक्षा अधिक शपथ पत्रे तयार आहेत. त्याचबरोबर अडीच लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आणि दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे आहेत. मात्र ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून आयोगाकडे करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

Rama Kankonkar Case: काणकोणकर हल्ला प्रकरण: रामा यांच्या पत्नीनं थेट पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध केली तक्रार; गुन्हे शाखेकडून चौकशीची मागणी

Goa Politics: 'आप'च्या राजकारणाची स्क्रिप्ट उघड! "छुपे साटेलोटे नेत्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत", काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Watch Video: "लड़कियों के हाथों में मजा बहुत है, वो...", पाकिस्तान महिला संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान Viral

Yashasvi Jaiswal: शुभमन गिलनंतर आता यशस्वी जैस्वालचाही 'कॅप्टन'पदावर डोळा; म्हणाला, "मला पण कर्णधार बनायचयं!"

SCROLL FOR NEXT