Shivsena Shinde Group Dainik gomantak
महाराष्ट्र

Shivsena Shinde Group: ठरलं! शिंदे गटाला मिळाले 'ढाल तलवार' चिन्ह

यापूर्वी ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह मिळाल्यानंतर, शिंदे गटाला कोणते चिन्ह मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला 'ढाल तलवार' हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव गोठवल्यानंतर ठाकरे गटाला 'शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव मिळाले आहे. तर, शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळाले आहे.

शिंदे गटाने चिन्हासाठी दिलेले तिन्ही पर्याय निवडणूक आयोगाने फेटाळून लावले. त्यानंतर तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड असे पर्याय शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर ' दोन तलवारी एक ढाल' असे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी अंधेरी विधानसभा निवडणूकीत मशाल आणि ढाल तलवार असा सामना पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

Cutbona Jetty: 100 बोटी, 3000 लोक पण मूलभूत सोयी शून्य! कुटबण जेटीवर आरोग्याचा प्रश्न झाला गंभीर, आमदारांनी दिला समस्या सोडवण्याचा शब्द

Bicholim Fish Price Hike: मान्सूनपूर्वी मासळीचे दर कडाडले! डिचोलीत ‘सुरमई’चा तोरा; मत्स्यखवय्यांच्या खिशाला कात्री

खरी कुजबुज: काँग्रेस आमदार कुणीकडे?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! 8 व्या वेतन आयोगात 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी, पगारात 283 टक्क्यांची वाढ होणार?

SCROLL FOR NEXT