Ekanth Shinde & Devendra Fadnavis
Ekanth Shinde & Devendra Fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस 'किंग मेकर' च्या भूमिकेत

दैनिक गोमन्तक

Ekanth Shinde: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे असतील. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही धक्कादायक घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आणि फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे मानले जात होते, मात्र या घोषणेने सारे चित्रच पालटले आहे. शिंदे यांच्यासह राज्यपालांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. (Eknath Shinde New CM Of Maharashtra BJP Leader Devendra Fadnavis Announced)

फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा असून भाजपसह अन्य 16 अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, 'एकनाथ शिंदे आज संध्याकाळी 7.30 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यानंतर येत्या काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. एवढंच नाही तर मी मंत्रिमंडळातून बाहेर राहणार असून सरकारला पूर्ण सहकार्य करणार आहे.'

'महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला'

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की, ''2019 च्या निवडणुकीनंतर आम्हाला बहुमत मिळाले. मात्र शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीशी तडजोड करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केले. बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर या दोन्ही पक्षांच्या विरोधात होते. तरीही उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी तडजोड करुन महाविकास आघाडी स्थापन केली. त्या सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन मंत्री तुरुंगात गेले. बाळासाहेब ठाकरे यांनी दाऊदला विरोध केला होता.''

उद्धव यांनी सावरकर आणि हिंदुत्वाचा अपमान केला होता

ठाकरे सरकार वारंवार सावरकरांचा आणि हिंदुत्वाचा अपमान करत होते. सत्तेत असण्याच्या शेवटच्या दिवशी औरंगाबादचे (Aurangabad) नामातंर 'संभाजी नगर' असे करण्यात आले. तेही जेव्हा राज्यपालांनी फ्लोर टेस्टचे आदेश दिले तेव्हा. नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारला पुन्हा नव्याने निर्णय घ्यावे लागतील कारण त्यांनी जे केले ते अजिबात मान्य होणारे नाही,' असेही फडणवीस म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव घेत त्यांना शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. याचे कारण तेच खरे शिवसेनेचे नेते आहेत. खेदाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार वगळता राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महत्त्व दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT