Chief Minister Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुख्यमंत्री Eknath Shinde का भेटतायेत उद्धव ठाकरेंच्या निकवर्तीयांना, 'निवडणुकीबाबत...'

Chief Minister Eknath Shinde: शिवसेनेतून बंडखोरी करुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे सध्या चांगलेच सक्रिय झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Chief Minister Eknath Shinde: शिवसेनेतून बंडखोरी करुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे सध्या चांगलेच सक्रिय झाले आहेत. गणपती उत्सवादरम्यान ते उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्यांची भेट घेत आहेत. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी उध्दव ठाकरेंचे चुलत बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या बैठकीकडे त्यांची बीएमसी निवडणुकीची रणनिती म्हणून पाहिले जात आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) घरी झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले होते की, 'ही बैठक राजकीय हेतूने प्रेरित नव्हती, तर राज यांच्यावर यापूर्वी शस्त्रक्रिया झाली असल्याने मी त्यांना भेटायला आलो होतो. परंतु भेटीदरम्यान जुन्या आठवणी ताज्या झाल्या. असे काहीसे संकेत त्यांनी दिले.

दुसरीकडे, राज ठाकरे यांना सोबत घेऊन भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे गट बीएमसी निवडणुकीत उतरु शकतात, असे मानले जात आहे. यामुळे शिवसेनेची मते कमी होण्यास मदत होऊ शकते आणि शेवटी तिघे मिळून बीएमसीची सत्ता काबीज करु शकतात. गुरुवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती.

याशिवाय, शिवसेनेचे दिग्गज नेते मनोहर जोशी यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. जोशी आणि नार्वेकर यांच्याशी गेल्या महिनाभरातील ही त्यांची दुसरी भेट होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. गेल्या महिन्यात मिलिंद नार्वेकर यांच्या आईच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT