Eknath Khadse arrives to ED office Dainik Gomantak
महाराष्ट्र

"नाथाभाऊंना छळण्यासाठीचं ED च षडयंत्र सुरू आहे"- एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांना काल ईडीने(ED) समन्स बजावत चॊकशीसाठी बोलावलं होत

दैनिक गोमन्तक

भोसरी(Bhosari) जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे(NCP) नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांना काल ईडीने(ED) समन्स बजावत चॊकशीसाठी बोलावलं होत आणि आता ते ED कार्यालयात दाखल झाले आहेत.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. याअगोदरच एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आणि आता ईडीने खुद्द एकनाथ खडसेंना नोटीस पाठवून चॊकशीसाठी आज हजार राहण्यास सांगितले होते.मटार काल अचानक एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर ते चौकशीला हजर राहणार की नाही याबाबत शंका होती.मात्र ते आता ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.

तत्पूर्वी खडसेंनी भाजपवर जोरदार टीका केली जाणीवपूर्वक मला त्रास दिला जात असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली "“या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू असून नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे. जळगावमध्ये व्हॉट्अपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे”, असे खडसे म्हणाले.

दरम्यान यावेळी बोलताना ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मी जात असून यापूर्वीही मी नेहमीच ईडीला सहकार्य केले आहे. आजही ज्या प्रश्नांबाबत चौकशी करण्यात येईल त्याबाबत मी उत्तर देणार आहे.असेही त्यांनी सांगितले आहे.

तसेच ज्या जमीन घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावरती लावला जात आहे मुळात ती जमिनीच वादग्रस्त असल्याचेही त्यांनी म्हण्टलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT