Pratap Sarnaik dainik gomantak
महाराष्ट्र

Pratap Sarnaik on ED Enquiry : ईडी कारवाईविरोधात प्रताप सरनाईकांची न्यायालयात धाव

ईडी कारवाईविरोधात न्यायालयात प्रताप सरनाईक अपील करणार

दैनिक गोमन्तक

मुंबई : केंद्र आणि राज्य यांच्यातील राजकीय भांडणात मला लक्ष केले जात असून ही कारवाई त्यामुळेच होत असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. तसेच, भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असून ईडीच्या नोटीसविरोधात आपण कोर्टात अपील करणार असल्याचे सरनाईक यांनी म्हटलं आहे. (ED's action will be challenged in the Supreme Court Explanation by Pratap Sarnaik)

ईडीकडून NSEL घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. ईडीने त्यांची 11.35 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यामध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. या कारवाईनंतर शिवसेना (Shivsena) आणि भाजप (bjp) यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपात वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्यात हिरानंदानी (Hiranandani) येथील घर आणि मिरा रोड येथील जमीन अशा दोन मालमत्ता जप्त केल्यानंतर ईडीने सरनाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया आपण पूर्ण करत असल्याचे सरनाईक यांनी म्हटलं आहे. तसेच आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून या नोटीशीविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच न्यायालय (Court) जो निर्णय देईल, त्या निर्णयानुसार पुढील निर्णय घेऊ असेही पुढे ते म्हणाले. तसेच याच्याआधी 2020 रोजी मध्येही आपल्यावर ईडीने (ED) कारवाई केली होती. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदार होणारी ती पहिली कारवाई होती. पण त्यानंतर अनेक लोकांवर कारवाई झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT