Sanjay Raut And Varsha Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

Patra Chawl land case: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने बजावले समन्स

वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्यानंतर समन्स जारी करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl land case) ईडी आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत. वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्यानंतर चौकशीसाठी ईडीने यांना समन्स बजावले आहे. या प्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांची चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

यानंतर, ईडीने म्हटले की ज्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे तो पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 1,000 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. एजन्सीने दावा केला की यामध्ये राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला 1.06 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे तर ज्याचा दावा यापूर्वी 83 लाखांपेक्षा जास्त होता. ईडीने त्यांच्यावर बलात्कार आणि खून प्रकरणातील अलिबाग जमीन व्यवहारातील प्रमुख साक्षीदाराला धमकावल्याचा आरोप देखील केला आहे.

या आधी 22 जुलै रोजी स्वप्ना पाटकर या महिलेने तक्रार दाखल केली होती. वृत्तानुसार, तिने दावा केला की बलात्कार आणि खुनाच्या धमक्या एका पेपरवर टाईप केल्या होत्या, जे तिला 15 जुलै रोजी देण्यात आलेल्या वृत्तपत्रामध्ये टाकण्यात आले होते.

विशेष म्हणजे संजय राऊत यांना ईडीने रविवारी रात्री उशिरा मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती आणि मुंबई न्यायालयाने (Bombay High Court) त्यांना चार दिवसांसाठी एजन्सीच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे. राजकीय सूडबुद्धीने आपल्याला फसवले जात असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना हा राजकीय सूड असल्याचं सांगितलं होतं तसेच रविवारी सकाळपासून माझे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले आहे.” आपण हृदयरोगी असल्याचे सांगून राऊत म्हणाले की, आपल्याला घराबाहेर पडण्याचीही परवानगी नाहीये.

दुसरीकडे, या प्रकरणात गुरुवारी रिमांड संपल्यानंतर ईडीने त्यांना न्यायालयात हजर केले. सुनावणीदरम्यान, ईडीने त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती, ती न्यायालयाने मान्य करत 8 ऑगस्टपर्यंत राऊत यांची कोठडी वाढवली.

त्यावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी संजय राऊत यांना विचारले होते की, तुम्हाला काही अडचण आहे का? यावर खासदार म्हणाले की, ज्या ठिकाणी त्यांना कोठडीत ठेवण्यात आले होते, तेथे कसल्याचे प्रकारचे व्हेंटिलेशन नाहीये.

न्यायमूर्तींनी ईडीला विचारले होते की तुम्ही यासाठी काय करत आहात? त्यावर ईडीने कोर्टात माफी मागितली आणि आम्ही त्यांना एसीमध्ये ठेवले आहे तर राऊत खोटे बोलत आहेत. त्यांनी पंखा मागितला आहे तसेच अशा परिस्थितीत, आम्ही व्हेंटिलेशन असलेली खोली देण्याचा प्रयत्न करत आहोत.

संजय राऊत आणि कुटुंबाच्या खात्यात 1 कोटी 6 लाख कसे आले आणि परदेश दौऱ्यांवर किती खर्च झाला, असे ईडीने न्यायालयामध्ये सांगितले होते. या छाप्यात ईडीला काही कागदपत्रे सापडली असून, त्यात प्रवीण राऊतकडून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम संजय राऊत यांना दिल्याचे देखील दिसून येते.

प्रवीण राऊत यांच्याकडून मिळालेल्या पैशातून अलिबागमधील जमीन खरेदी केल्याचा दावा ईडीने याआधी केला होता. येथे स्वप्ना पाटकर यांच्या वकिलाने सांगितले की, स्वप्ना पाटकर यांना संजय राऊत यांच्याकडून धमकावले जात आहे. संजय राऊत यांना अटक झाली, मग धमक्या कोण देत आहेत, असा सवाल न्यायाधीशांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Goa Live News: देवसडा- धारबांदोडा अपघात; पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT