नवनीत राणा यांचे 'अच्छे दिन' येणार? शिंदे सरकारमध्ये रवी राणांना मंत्री पद मिळणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात नवनीत राणा आणि रवी राणा यांचे नाव अचानक चर्चेमध्ये आले आहे.
Navneet Rana and Ravi Rana
Navneet Rana and Ravi Rana Dainik Gomantak

महाराष्ट्राच्या राजकारणात नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांचे नाव अचानक चर्चेमध्ये आले. अपक्ष खासदाराने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खुले आव्हान दिले होते. नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनाही अटक करण्यात आली होती. आता त्यांचे अच्छे दिन येणार आहेत असे म्हणायला हरकत नाही. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारातही राणा यांना स्थान मिळू शकते. रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. (Maharashtra Politics Crisis)

Navneet Rana and Ravi Rana
संजय राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केली होती, तर शिवसैनिकांच्या प्रचंड विरोधानंतर त्यांनी रद्द केली. संजय राऊत म्हणाले होते की, नवनीत राणा यांच्यावर केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम केल्याचा आरोप आहे.

या दोन्ही नेत्यांना 23 एप्रिल रोजी शनिवारी मुंबई पोलिसांनी अटक केली होती.'वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याप्रकरणी' या दोन्ही नेत्यांना मुंबई पोलिसांनी अटकेत घेतले होते. मुंबई पोलिसांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर राणा यांच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात कलम 153 (ए), 34, आयपीसी आर/डब्ल्यू 37(1) 135 मुंबई पोलीस कायदा अंतर्गत देखील गुन्हा दाखल केला होता.

Navneet Rana and Ravi Rana
Mumbai: 1400 कोटी रुपयांचे 703 किलो एमडी अमली पदार्थ जप्त, 5 जणांना अटक

ठाकरे यांनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप करत राणा कुटुंबीयांनी प्रत्युत्तर दिले होते. नवनीत कौर म्हणाल्या होत्या की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आम्हाला त्रास देण्याचे आदेश दिले आहेत, तर त्यांचे पती रवी राणा म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंना फक्त राजकीय फायदा हवा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com