Sakal news platform Dainik Gomantak
महाराष्ट्र

E-Sakal: 'सकाळ'ची डिजिटल क्रांती! 25 वर्षांच्या प्रवासात गाठला 13.5 मिलियनचा टप्पा

E-Sakal News Website No. 1: घराघरांमध्ये पोहोचलेला सकाळ माध्यमसमूह वाचकांच्या आवडीचा आणि विश्वासाचा आहे

Akshata Chhatre

E-Sakal: सकाळ माध्यम समूहाने पुन्हा एकदा महत्वपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. वर्तमानपत्रापासून झालेली ही सुरुवात डिजिटल युगात सुद्धा तेवढ्याच जोमानं वाटचाल करतेय. डिजिटल सकाळने अलीकडेच २५ वर्ष पूर्ण केलीयेत. २५ वर्ष सातत्याने मेहनत केल्यानेच सकाळ माध्यम समूह वाचकांच्या पसंतीस उतरला आहे. घराघरांमध्ये पोहोचलेला सकाळ माध्यमसमूह वाचकांच्या आवडीचा आणि विश्वासाचा आहे.

सर्वाधिक वाचलं जाणारं संकेतस्थळ

कॉमस्कोअरने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी २०२५ मध्ये सकाळ माध्यमसमूहाचे 'ई-सकाळ' हे संकेतस्थळ सर्वाधिक वाचलं जाणारं संकेतस्थळ आहे. सकाळने १३.५ मिलियनचा आकडा गाठत शर्यतीत पहिला क्रमांक पटकावला आहे. सध्या इंटरनेटच्या साहाय्याने लोकं बातम्या शोधतायत आणि वाचतायत. ई-सकाळच्या माध्यमातून वाचकांपर्यंत त्यांचा आवडता कन्टेन्ट पोहोचवला जातोय.

कधी झाली ई-सकाळची सुरुवात?

२६ जानेवारी २००० पासून ई-सकळची सुरुवात झाली. गेलाय २५ वर्षांच्या काळात या पोर्टलने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दाखवली आहे. साम आणि ई-सकाळ या वेबसाईटच्या अंतर्गत महाराष्ट्रच्या बातम्यांवर नजर ठेवली जाते. यासोबतच देश-विदेशात घडणाऱ्या प्रमुख घडामोडी, टेकनॉलॉजीच्या विश्वात होणारे बदल आणि क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं जातं.

महाराष्ट्रातील सरकारच्या हालचाली शब्दांमध्ये मांडण्यासाठी सरकारनामा काम करतं. शेतकऱ्यांना आपलंस वाटावं, शेतीच्या विषयक आधीक माहिती मिळावी म्हणून ऍग्रोवन कार्यरत आहे. याशिवाय गोव्याबद्दल बातम्या देणारं दैनिक गोमंतक, गोमंतक टाइम्स हे देखील महत्वाचे पोर्टल्स आहेत.

गोमंतक वेब पोर्टल:

गोमंतक वेब पोर्टलच्या अंतर्गत गोव्यातील राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्वाच्या बातम्या जाणून घेता येतात. गोव्यातील संस्कृती आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी हे एक महत्वाचं साधन मानलं जातं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT